Subscribe Us

header ads

जयभिम महोत्सवासाठी बीड नगरी झाली सज्ज !नियोजन : समाज बांधवातून पहिल्याच बैठकीत जमा झाले पाच लाख रूपये

बीड स्पीड न्यूज 


जयभिम महोत्सवासाठी बीड नगरी झाली सज्ज !
नियोजन : समाज बांधवातून पहिल्याच बैठकीत जमा झाले पाच लाख रूपये



 बीड / प्रतिनिधी_संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त शनिवार (दि.१९) फेब्रुवारी रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे  मोठ्या उत्साहात पार पाडली. या बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२२ ची सुकानू समिती जाहीर करण्यात आली. तसेच गतवर्षीच्या जयंती खर्चाचा व उर्वरित जमा रक्कमेचा अहवाल या बैठकीत मांडण्यात आला. तसेच पहिल्याच बैठकीत तब्बल पाच लाख रूपये जमा झाले. ऐवढेच नाही तर हा जयभिम महोत्सव अभूतपुर्व साजरा करण्यासाठी बीड शहरातील आंबेडकरी जनता सज्ज झाली आहे.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती  २०२२ ची महत्वपूर्ण बैठक रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे, यांच्या मार्गदर्शनासह अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रा. प्रदीप रोडे, अजय सवाई, अधीक्षक अभियंता इंजि. कोलमकर, गणेश वाघमारे, किशोर कागदे, डॉ. सतिष साळुंके, अमरसिंह ढाका, गंगाधर पुरी, रामसिंग टाक,अरुण भोले, राजू जोगदंड, बबन वडमारे, बी. डी. साळवे, अकुंश निर्मळ, ॲड. राहुल साळवे, ॲड.अभय मगरे, शीतलकुमार सुकाळे, अरुणाताई आठवले, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, इंजि भोलेनाथ मुने, एस.टी. गायकवाड, इंजि. वचिष्ट तावरे, सुभाष लोणके, संतोष जाधव आदी उपस्थित होते. या बैठकीत दरवर्षाप्रमाणे मागील वर्षांच्या जमा-खर्चाचा पूर्ण अहवाल ॲड. सुरेश वडमारे यांनी सादर केला.आभार ॲड. भगवान कांडेकर यांनी मानले. दरम्यान या बैठकीत  दिपक गंगाधरे, कारागृह अधीक्षक संजय कांबळे, दिलीप भोसले, महेंद्र गायकवाड यांना आदरांजली वाहण्यात आली. या बैठकीस आंबेडकरी जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा