Subscribe Us

header ads

निसार खतीब यांची मुस्लीम लीगच्या संघटक पदी नियुक्ती वृत्त खोटी - सी. एच. रहेमान

बीड स्पीड न्यूज 

निसार खतीब यांची मुस्लीम लीगच्या संघटक पदी नियुक्ती वृत्त खोटी - सी. एच. रहेमान

मुंबई_ निसार खतीब यांची मुस्लीम लीगच्या मराठवाडा संघटक पदी नियुक्ती करण्यात आल्याची बातमी अनेक वर्तमानपत्रात प्रकाशित झाली आहे, परंतु ही बातमी चुकीची खोटी असून  निसार खतीब यांची दोन वर्षापुर्वीच लोकसभा निवडणुकीत मुस्लीम लीग या पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी वर्तमानपत्रांना खोटी बातमी देऊन जनतेची दिशाभुल केली आहे. त्यांचे बातमीत दिनांक 12/01/2022 ची राज्य कार्यकारणीची बैठकचा उल्लेख करण्यात आला आहे. या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारीणीची अनुमती नव्हती व या बैठकीत राज्य कार्यकारीणीचे कोणतेही पदाधिकारी उपस्थित नव्हते. निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभुल करण्यात येत आहे. मुस्लीम लीग या पक्षासंबंधी कोणीही निसार खतीब यांच्याशी संपर्क व व्यवहार करु नये. अशी सुचना मुस्लीम लीग महाराष्ट्र राज्य महासचिव सी. एच. अब्दुल रहेमान यांनी प्रसिध्द पत्रकातुन दिली आहे. यासंबंधी त्यांच्याशी त्यांचा मोबाईल क्र. 9819722329 वर संपर्क करु शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा