Subscribe Us

header ads

पंकजा मुंडेंनी मारली बाजी; पाच पैकी तीन नगर पंचायतींवर वर्चस्व;

बीड स्पीड न्यूज 

पंकजा मुंडेंनी मारली बाजी; पाच पैकी तीन नगर पंचायतींवर वर्चस्व


बीड_पुन्हा एकदा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे. जिल्ह्यातील पाच नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाने वर्चस्व राखलं. वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी, पाटोदा शिरूरमध्ये भाजपने बाजी मारली आहे. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वडवणी नगरपंचायतीत भाजपाचे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
पाच नगर पंचायतीसाठी मागील महिन्यात निवडणूक पार पडली. यामध्ये तीन नगरपंचायतींमध्ये भाजपने तर केजमध्ये जनविकास आघाडी आणि वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. त्यानंतर सोमवारी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी पल्लवी धोंडे यांची बिनविरोध तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्त्रबुद्धे यांची बिनविरोध निवड झाली.पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदी सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची तर उपनगराध्यक्ष शरद बांदळे यांची निवड झाली. केजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवून काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडी बरोबर हात मिळवणी केल्यानं येथे काँग्रेसने सत्ता मिळवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा