Subscribe Us

header ads

हायवेवर धावत्या कारने अचानक घेतला पेट; प्रसंगावधान राखत वेळीच गाडी उभी केल्याने कारमधील पाचजणांचे प्राण वाचले

बीड स्पीड न्यूज 

हायवेवर धावत्या कारने अचानक घेतला पेट प्रसंगावधान राखत वेळीच गाडी उभी केल्याने कारमधील पाचजणांचे प्राण वाचले 

केज_ एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास केज अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळजवळ घडली. प्रसंगावधान राखत वेळीच गाडी उभी केल्याने कारमधील पाचजणांचे प्राण वाचले आहेत.या बाबतची माहिती अशी की, लातूर येथील सीए गणेश महापुरकर हे आज सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास लातूर येथून कारने (एमएच-४८ एस-२८५२) बीडकडे जात होते. कारमध्ये सीए महापूरकर यांच्यासह पाचजण होते. सकाळी साडेनऊच्या दरम्यान, कुंबेफळजवळ येताच कारच्या समोरच्या बाजूने धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. यामुळे चालकाने लागलीच कार रस्त्याच्या बाजूला घेत उभी केली.प्रसंगावधान राखत सर्वजण लागलीच कारमधून बाहेर पडले. त्याचक्षणी कारने पेट घेतला. काही क्षणात कारने पेट घेतला सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे जिवीतहानी  झाली नाही. सदर घटनेची माहिती केज पोलिसांना देण्यात आली होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा