Subscribe Us

header ads

साळेगाव येथे आज उपोषण सुरू

बीड स्पीड न्यूज 

साळेगाव येथे आज उपोषण सुरू 



गौतम बचुटे/केज :- गावच्या पूर्व भागात पाणीच येत नसल्याने आज साळेगाव ता. केज येथील नागरिक शिवाजी चौकात उपोषणाला बसले आहेत.या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील बस स्टँडच्या परिसरातील भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नागरिकांनी अनेक वेळा मागणी करूनही ग्रामपंचायने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील नागरिकांनी दि.३ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, जर या भागात पाणी पुरवठा झाला नाही; तर दि. १३ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणाचा ईशारा दिला होता.त्या नुसार आज दि.१३ फेब्रुवारी रोजी साळेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात बालासाहेब बचुटे, लक्ष्मण लांडगे, सचिन राऊत, बलभीम बचुटे, जय जोगदंड,  रत्नाकर राऊत, रामेश्वर शिंदे, सय्यद अझर, अजय बचुटे, अक्षय वरपे, सलामत पठाण, शिवसेनेचे ज्योतिकांत कलसकर हे उपोषणार्थी उपोषणाला बसले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा