Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यातील केरोसीन हॉकर्सची 27 मार्च रोजी महत्वपूर्ण बैठक

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्ह्यातील केरोसीन हॉकर्सची 27 मार्च रोजी महत्वपूर्ण बैठक


बीड (प्रतिनिधी) 24 मार्च बीड जिल्ह्यातील मागील तीन वर्षापासुन राज्य सरकारकडून केरोसीन नियतन स्थगीत करण्यात आल्याने शासनमान्य केरोसीन हॉकर्स,किरकोळ परवाना धारक यांचेवर उपासमारीची वेळ आली आल्याने शासनाच्या या अन्यायकारक भूमिके विरोधात भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या नेतृत्वा खाली लोकशाही मार्गने व्यापक असा लढा उभारला गेला शेवट पर्यंत हा लढा सुरुचं होता शेवटी येथील निगरगठ्ठ राज्यकर्त्यांच्या दुटप्पी भूमिकेविरोधात हॉकर्स बांधवांना न्याय मिळावा या हेतूने नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी विधीतज्ञ अँड अमोल गायकवाड व अँड विजय शिंदे यांच्या मार्फत उच्च न्यायल्यात याचीका दाखल केली सदरील प्रकरणात हॉकर्स च्या बाजूने निकाल लागला असून उर्वरित हॉकर्स ला या निकालाचा लाभ मिळावा या साठी व पुढील नियोजनासाठी बीड जिल्ह्यातील केरोसीन हॉकर्स, किरकोळ, व इतर परवाना धारकांची बैठक आयोजित केली आहे त्तरी दिनांक 27 मार्च रविवार रोजी ठीक दुपारी 12:30 वा,बीड येथील शासकीय विश्राम गृह येथे बीड जिल्ह्यातील सर्व हॉकर्स,किरकोळ, व इतर परवाना धारकांनी बैठकीस उपस्थित रहावे असे आव्हाण आदर्श महाराष्ट्र केरोसीन हॉकर्स संघटने च्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा