Subscribe Us

header ads

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी हेमा पिंपळे

बीड स्पीड न्यूज 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी हेमा पिंपळे


बीड-:राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी हेमा पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नेमकी कोणत्या महिला नेत्याची नियुक्ती अशीच चर्चा होती. त्यात आता हेमा पिंपळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्याने पक्षातील पदावरून रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. आता महिला राष्ट्रवादी अध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागते हा मोठा प्रश्न होता. मात्र आता हेमा पिंपळे यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशा अध्यक्षपदी अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा