Subscribe Us

header ads

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा दणका;तब्बल 32 लाख रुपयांचा गुटखा जप्त

बीड स्पीड न्यूज 

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा दणका;
तब्बल 32 लाख रुपयांचा गुटखा जप्त 

माजलगाव-: माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 32 लाख 48 हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे.पात्रुड येथील मोमीन बाबु अब्दुल मजिद याच्या घरी व शेतातील गोडाऊन मध्ये गुटखा असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाली त्यावरुन त्यांच्या पथकाने धाड टाकून गोवा राजनिवास हिरा एकूण असा 32 लाख 48 हजार रुपयाचा गुटखा मिळून आला. तो जप्त करून पोलीस ठाणे माजलगाव येथे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या गुप्त बातमी वरून बालाजी दराडे बाबासाहेब बांगर राजू वंजारे संजय घुले यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा