Subscribe Us

header ads

नोकरी करत संगीत कला जोपासणारे जिल्ह्याचे मुस्लिम समाजातील एकमेव संगीत विशारद शेख मजहरूद्दीन यांना पद्मपाणि प्रतिष्ठानचा संगीत रत्न पुरस्कार जाहीर

बीड स्पीड न्यूज 

नोकरी करत संगीत कला जोपासणारे जिल्ह्याचे मुस्लिम समाजातील एकमेव संगीत विशारद शेख मजहरूद्दीन यांना पद्मपाणि प्रतिष्ठानचा संगीत रत्न पुरस्कार जाहीर


बीड (प्रतिनिधी) - तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अनुरेखक पदावर कार्यरत असलेले शेख मजहरूद्दीन महेमुदोद्दीन यांना पद्मपाणि प्रतिष्ठानचा संगीत रत्न पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजातून मजहरूद्दीन हे एकमेव संगीत विशारद झालेले आहेत. ते गान तपस्वी कै. पंडित विष्णुपंत धुतेकर आणि त्यांचे सुपुत्र श्री. सुदर्शन धुतेकर यांच्याकडे भारतीय शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेऊन संगीत विशारद झाले. गायन कलेत प्राविण्य मिळविल्यानंतर त्यांनी आकाशवाणीवरून गझल गायनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहे. शिवाय पैगंबरवासी मुहम्मद रफी गीत गायन स्पर्धेत तसेच भावगीत, भक्तिगीत, सुगम गायनात अनेक वेळा प्रथम व द्वितीय पारितोषिके पटकावली आहेत. सन 2005 साली त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल शक्ती प्रतिष्ठान ने त्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. सन 2006 साली बीड नगरपरिषद व परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देण्यात येणाऱ्या स्वरश्री या पुरस्काराने त्यांना तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांच्या हस्ते तत्कालीन जिल्हाधिकारी पियुष सिंह आणि परिवर्तन प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. सतीश साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले होते. सन 2008 साली क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्याने परिवर्तन प्रतिष्ठान द्वारा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये सुद्धा त्यांना गौरविण्यात आले होते. सन 2016 साली समांतर काँग्रेस पार्टी तथा मराठवाडा वादी जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या चंपावतीरत्न पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांनी हैदराबाद, नांदेड, औरंगाबाद येथे गझल गायनाचे अनेक कार्यक्रम केले असून बीड जिल्ह्यात कोणतीही संगीताची मैफल असल्यास त्यांना त्यात आवर्जून आमंत्रण दिले जाते. अशा या हरहुन्नरी कलावंतास त्यांच्या आतापर्यंतच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीकडे पाहून पद्मपाणी प्रतिष्ठानने यावेळी राष्ट्रीय व राज्यस्तरीय संगीतरत्न हा पुरस्कार जाहीर केला असून हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या 27 मार्च 2022 रविवार रोजी दुपारी 12:30 वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा