Subscribe Us

header ads

एक हजाराची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर एसीबीची कारवाई

बीड स्पीड न्यूज 


एक हजाराची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर एसीबीची कारवाई

शिरूर- : सात-बारा, आठ-अ, फेरफाराचे कागदपत्रे देण्यासाठी एक हजारांची लाच मागून तडजोडीअंती पाचशे रुपयांचीलाच स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या शिरूर तालुक्यातील गोमाळवाडा सजाच्या तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या पथकाने कारवाई केली.नामदेव राजेंद्र पाखरे (वय 36) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. पाखरे हे शिरुर तालुक्यातील गोमाळवाडा सज्जाचे तलाठी असून सध्या मंडळ अधिकारी कार्यालय शिरुर (का) येथे कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी एक हजार रुपयांची मागणी केली. तडजोड अंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी पोखरे तलाठ्यावर सोमवारी (दि. 21) बीड एसीबीने कारवाई केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड, गणेश म्हेत्रे यांनी केली. एसीबीच्या पथकाने कारवाई करून त्याच्यावर शिरूर ठाण्यात गुन्हा नोंद केला.या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा