Subscribe Us

header ads

शुक्रवारी माऊली हॉस्पिटलचा संत महंतांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित रहा- डॉ. हनुमान जाधव

बीड स्पीड न्यूज 

शुक्रवारी माऊली हॉस्पिटलचा संत महंतांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित रहा- डॉ. हनुमान जाधव


बीड । प्रतिनिधी_रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड करणारे व  रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा मानून रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे डॉ. हनुमान जाधव यांनी आपल्या गावातील आणि परिसरातील रुग्णांची सेवा करण्यासाठी आपल्या गावी (कुंभारवाडी फाटा, ता. गेवराई) येथे भव्य माऊली हॉस्पिटल सुरू केले असून त्याचा संत महंतांच्या हस्ते शुक्रवारी दि. 25 मार्च रोजी उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. या भव्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. हनुमान जाधव यांनी केले आहे.डॉ. हनुमान जाधव यांची काम करण्याची पद्धत आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणे तर रुग्णांशी एक अनोखा जिव्हाळा जपत जी सेवा दिली त्याची पावती म्हणून आज त्यांचं स्वतःच भव्य दिव्य अस ग्रामीण भागात एक हॉस्पिटल उभारत आहे. याचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दि. 25 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ह.भ.प.महादेव महाराज (चाकरवाडी), ह.भ.प. रामदास महाराज (तिप्पटवाडी), ह.भ.प. शिवाजी महाराज ( श्रीक्षेत्र नारायणगड) यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. तरी या शुभप्रसंगी श्री सत्यनारायण पुजा व तिर्थ प्रसादास उपस्थित राहुन आमचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन श्री. जाधव नारायण लिंबाजी, डॉ. जाधव हानुमान नारायण यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा