Subscribe Us

header ads

राहूल टाळके सारख्या कर्तव्यदक्ष सोज्वळ अभियंत्याचे निलंबन मागे घ्या - अमोल गलधर

बीड स्पीड न्यूज 


राहूल टाळके सारख्या कर्तव्यदक्ष सोज्वळ अभियंत्याचे निलंबन मागे घ्या - अमोल गलधर


बीड (प्रतिनिधी) - विधानसभेच्या लक्षवेधी मध्ये आ. विनायक मेटे यांनी बीड नगर परिषदेच्या अनेक विभागातील गलथान कारभार मांडल्यानंतर चार जणांचे निलंबन करत असल्याचे राज्‍यमंत्री तनपुरे यांनी म्हटले. यामध्ये राहुल टाळके यांच्यासारख्या एका कर्तव्यदक्ष व सोज्वळ अभियंत्याचा नाहक बळी गेला असल्याचे स्पष्ट करत त्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा अमोल गलधर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, आ. मेटे यांच्या लक्षवेधी वरून नगर विकास राज्यमंत्री तनपुरे यांनी केलेली तडकाफडकी कारवाई ही चांगल्या अधिकाऱ्यांना व कर्मचार्‍यांच्या विरोधात जाणारी असून कारवाईच करायची असेल, निलंबनच करायचे असेल तर ज्यांना आता निलंबित केले त्यांच्या ऐवजी खालच्या लोकांची अगोदर चौकशी करा. त्यात ते निश्चितपणे दोषी आढळून येतील. खालच्या लोकांविरोधात माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत. योग्य वेळी मी ते योग्य ठिकाणी सादर करेन तेव्हा त्यांच्यावर अगोदर कारवाई करा. चांगले काम करणाऱ्यांवर विनाकारण निलंबनाचे हत्यार वापरू नका तसेच अभियंता राहुल टाळके यांच्यासह निलंबित करण्यात आलेले योगेश हाडे, सलीम ट्रेसर आणि जाधव या सर्वांचे निलंबन मागे घ्या. अन्यथा लोकशाही मार्गाने या निलंबनाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा अमोल गलधर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा