Subscribe Us

header ads

मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांचे सह इतर कर्मचाऱ्यांवर केलेली कार्यवाही निषेधार्थ नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड स्पीड न्यूज 

मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांचे सह इतर कर्मचाऱ्यांवर केलेली कार्यवाही निषेधार्थ नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड (प्रतिनिधी) 21 मार्च विधान परिषदे सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावरून बीड नगर परिषदेचे मुख्यधिकारी डॉ उत्कृष गुट्टे, जिल्हा प्रकल्प अधिकारी अंधारे मॅडम, पाणी पुरवठा अभियातां राहुल टाळके, बांधकाम विभागाचे हाडे यांचे सह इतर कर्मचाऱ्यांवर राज्याच्या नागरी विकास विभागाने  निलंबनाची कारवाई केल्याने जबाबदारीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे एक प्रकारे खच्चीकरन केले. असून सदरची कार्यवाही निषेधार्थ आहे. गेल्या दोन महिन्यापासुन नगर परिषदेवर प्रशासक आले असून अतिशय योग्य रीतीने बीड शहराला मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी मुख्यधिकारी गुट्टे सह टाळके, हाडे यांनी परिश्रम घेतले आहे. त्यांच्या चांगल्या कामाची अशा पद्धतीने पावती मिळणे हे खेदजनक आहे. ज्यांनी गेल्या तीस वर्षात फुकटच्या आमदारकिवर  मलिदा लाटला अशा कर्तृत्व शून्य सदस्यांनी कायम कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना छळण्याचे महापाप केले आहे.सदरील केलेली निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी या साठी उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याचे भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा