Subscribe Us

header ads

ग्रामिण रस्ते ग्रामस्थांसाठी की आधिकारी-ठेकेदार पोसण्यासाठी??जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड स्पीड न्यूज 


ग्रामिण रस्ते ग्रामस्थांसाठी की आधिकारी-ठेकेदार पोसण्यासाठी??जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
_______
बीड प्रतिनिधी_बीड जिल्ह्य़ातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बीड येथील प्रशासकीय आधिकारी यांनी संगनमतानेच ठेकेदार यांच्याशी निकृष्ट   दर्जाचे रस्ते, गौणखनिज चोरी, रस्त्याची कामे वेळेत पुर्ण न करणे, दंड आकारणीचे आदेश असुन सुद्धा दंड न भरणे आदि प्रकरणात शासनाची दिशाभूल करून शासनाचा महसुल बुडवून कोट्यावधी रूपयांचे नुकसान व ग्रामस्थांची अडचण आदि प्रकरणात संबधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी ठेकेदार यांच्या कंपन्या काळ्या यादीत टाकण्यात येऊन संबधित आधिकारी व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी आदि मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा 

कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२१ मार्च २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे ,मोहम्मद मोईज्जोदीन बीडकर, शेख मुबीन, किस्किंदा पांचाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,पांचाळ प्रमोद, आरूण खेमाडे, गायकवाड जे.एन.,यल्लु रजपुत सहभागी असून निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत  बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसुल मंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद,लाचलुचपत प्रतिबंधक विभागीय औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले. 

सविस्तर माहीतीस्तव:-
______
बीड जिल्ह्य़ातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड यांच्यामार्फत करण्यात आलेले निकृष्ट रस्त्याप्रकरणात कार्यकारी अभियंता यांच्या व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी तसेच वेळेत काम पुर्ण न करणे व अतिशय निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी व ठेकेदार यांच्या कंपन्या काळ्या यादीत टाकुन गौणखनिज चोरी प्रकरणात आर्थिक दंड आकारण्यात यावा.

बीड जिल्ह्य़ातील निकृष्ट रस्ता कामे
_____
 अ) बीड तालुक्यातील 
१)बीड तालुक्यातील मौजे मुळुकवाडी ते मसेवाडी रस्ता सुधारणा लांबी  २:८०० किमी अंदाजे किंमत १ कोटी २६ लाख मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड 
१) बीड तालुक्यातील पालवण भाळवणी- बेलेश्वर- लिंबागणेश १३ कोटी  रूपये 
२)बीड तालुक्यातील पिंपरनई ते बांगरवाडा रस्ता, अडीच कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 
२)बीड तालुक्यातील लिंबागणेश-अंजनवती-घारगाव मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 
३)बीड तालुक्यातील उमरद-नागापुर-ब-हाणपुर ४ कोटी ग्रामिण रस्ते विकास संस्था 
४)म्हाळसजवळा ते चौसाळा रस्ता, सार्वजनिक बांधकाम विभाग 
५)बीड तालुक्यातील मन्यारवाडी-आंबेसावळी,ढेकणमोहा,ब-हाणपुर ,-नागपुर ते उंबरी फाटा 
६)बीड तालुक्यातील मौजे पाटोदा (बेलखंडी)ग्रांमपंचायत अंतर्गत पाटोदा (बेलखंडी)ते हनुमानवस्ति 
७)बीड तालुक्यातील इजिमा ११४ ते मौजे धुमाळवाडी रस्ता सुधारणा 
८)बीड तालुक्यातील मौजे पिंपळगाव ते मानेवाडी  मार्गे तेलपवस्ती रस्ता जुन्या रस्त्यासह  पुलाची डागडुजी, नोंद मात्र नव्या कामाची 

ब) पाटोदा तालुक्यातील 
१)मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मौजे ढाळेवाडी ते पाटोदा ६ किमी अंदाजे किंमत ३ कोटी २२ लाख 
२)पाटोदा तालुक्यातील मांजरसुंभा पाटोदा ते सौंदाणा १:७ किलोमीटर अंदाजे किंमत ८२ लाख रूपये 

क) आष्टी तालुक्यातील 
१)आष्टी शहरापासुन आयटीआय काॅलेज रस्ता-शिंदेवाडी फाट्यापर्यंत डांबरीकरण व मजबुतीकरण 
२) आष्टी तालुक्यातील आष्टी ते शेकापुर-देसुर बांधकाम विभाग मार्फत रस्ता अडीच कोटी किंमत 
३)आष्टी तालुक्यातील धानोरा ते घोंगडेवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास 

ड) गेवराई तालुक्यातील 
१) उमापूर ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मारूतीची वाडी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत. 
२)गेवराई तालुक्यातील मौजे टाकरवन ते टाकरवन फाटा रस्ता 




 कार्यकारी अभियंता बेद्रे यांची व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक  विभागामार्फत चौकशी करा 
_________________

 महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था, कार्यकारी अभियंता, ए.एम. बेद्रे  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नोटीस बजावली गौणखनिज कंत्राटदाराने कोठुन आणले?याची तपासणी न करताच देयके, कंत्राटदाराने गौणखनिज पावत्या आणि माहीती दिली नसतानाच देयके अदा केले, शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता असुन शासकीय कामात जाणुनबुजुन निष्काळजीपणा केल्याचे नोटीसीत म्हटले आहे, जोगदंड यांच्या डी. बी. कन्स्ट्रक्शन यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच तत्कालीन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था ए.एम.बेद्रे यांची व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. 



 डी. बी. कन्स्ट्रक्शन दंड आकारणीचे आदेश, वसुली मात्र नाही 
__________________
--डाॅ.बाबु जोगदंड यांच्या डी .बी कन्स्ट्रक्शने रस्त्याची कामे वेळेत पुर्ण केली नाहीत म्हणून ग्रामिण रस्ते विकास संस्थेने ठेकेदार जोगदंडच्या डीबी कन्स्ट्रक्शनला १ ऑक्टोबर  २०१९ पासुन प्रतिदिवस १००० रूपये दंड ठोठावला, त्या दंडाची रक्कम १९ डिसेंबर २०१९ पर्यंत ४ लाख ४४ हजार रूपये होती, मात्र वसुलीच करण्यात आली नाही संबधित प्रकरणात दंड वसुल करण्यात यावा. 

  गौणखनिज चोरी प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात यावी 
________
बीड जिल्ह्य़ातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्या आधिकारी व ठेकेदार यांनी संगनमतानेच गौणखनिज चोरी करून रस्ते कामासाठी वापर केला असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच शासनाची दिशाभूल व कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडवून आर्थिक नुकसान केल्याबद्दल आवश्यक कारवाई करण्यात यावी. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा