Subscribe Us

header ads

पेठ बीड भागातील भिम सृष्टी ची दुरुस्ती करून शहरातील सर्व बुद्ध विहारास रंगगोटी करा ---- अँड विकासजी जोगदंड यांची मागणी


बीड स्पीड न्यूज 


पेठ बीड भागातील भिम सृष्टी ची दुरुस्ती करून शहरातील सर्व बुद्ध विहारास रंगगोटी करा ---- अँड विकासजी जोगदंड यांची मागणी 

बीड (प्रतिनिधी) 4 मार्च तमाम भारतीयांचे उधारकर्ते विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एप्रिल महिन्यात 131 वी जयंती असून जगभरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात येते मागील दोन वर्षापासुन कोरोना च्या निर्बंधामुळे महामांनवाची जयंती व इतर उत्सव साजरा करता आले नाहीत परंतु या वर्षी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात येणार असून पेठ बीड भागात डॉ आंबेडकर यांच्या जीवन पटावर आधारीत भिम सृष्टी असून सध्या तेथील चित्रफलकाची दुरावस्था झाली असल्याने दुरुस्ती करणे महत्वाचे आहे तसेच जयंती निमित्त संबंध बीड शहरातील बुद्ध विहारात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात त्यामुळे नगर परिषदेने बीड शहरातील संपूर्ण बौद्ध वस्त्यातील बुद्ध विहारास रंगरंगोटी करून समाज बांधवांच्या भावनेचा सन्मान करावा अशा अश्याचे निवेदन भिम स्वराज्य कामगार संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड,यांनी शिष्टमंडळा सह आज रोजी उपविभागीय दंडाधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक मा टिळेकर यांची भेट घेऊन दिले याप्रसंगी भिम स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ते तथा आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते अशोकजी कांबळे, बीड स्पीड चे प्रतिनिधी नवनाथ गोरे,अप्पा चक्रे,सचिन जाधव, मंगेश जोगदंड, महादेव वंजारे, राजेश कोकाटे, लखन शिंदे,
लक्ष्मण जोगदंड, गोरख जोगदंड,अजय जोगदंड,राजु जोगदंड सह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा