Subscribe Us

header ads

आमदार संदीप क्षीरसागर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरगुती वादावर योगेश क्षीरसागरांकडून खुलासा

बीड स्पीड न्यूज 

आमदार संदीप क्षीरसागर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरगुती वादावर योगेश क्षीरसागरांकडून खुलासा

बीड_ आम्ही स्व.केशरबाई क्षीरसागर यांचे वारसदार आहोत. आमचे वडील ३५ वर्षे नगराध्यक्ष राहिले; पण कधी कोणाला अपशब्द बोलत नाहीत. आमदारांना कोण मुर्खपणाचा सल्ला देतंय काय माहिती. आम्ही एका घरात, एका छताखाली राहतो; पण एकमेकांचे तोंडही पहात नाही, असे सांगत माजी  नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या घरातील वादावर खुलासा केला. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व संदीप क्षीरसागर हे राजकीय विरोधक असूनही एकाच छताखाली राहतात तरी कसे? या चर्चेला आता उत्तर मिळाले  आहे.२५ फेब्रुवारी रोजी मुद्रांक कार्यालयात गोळीबार झाला. यात आमदारांचे वडील व दोन बंधू आणि माजी नगराध्यक्ष व त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला.यामुळे शहरात राजकीय तणाव निर्माण झाला होता. हे कट्टर विरोधक एकाच छताखाली कसे रहात असतील, असा सवाल कार्यकर्त्याच्या मनात होता. याच अनुषंगाने गुरुवारी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागरांना हा प्रश्न विचारला. यावर त्यांनी या वादावर खुलासा करत आपण एका छताखाली रहात असलो तरी एकमेकांचे तोंडही पाहत नसल्याचे सांगितले. त्यामुळे बाहेर जो राजकीय वाद आहे, तोच घरातही असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

सुख-दुखात एकमेकांच्या सोबत आहोत. 


एका छताखाली रहात असलो तरी सुख-दुखा:त एकमेकांच्या सोबत आहोत. सणावाराला लहान मुले, महिलांचे ये-जा होतच असते; परंतु आम्ही कधी एकमेकांना बोलायचे तर लांबच; परंतु तोंडही पाहत नाहीत. कधी येता-जाता एकमेका समोर येतात पण आम्ही कधीच बोलत नाहीत, असेही डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा