Subscribe Us

header ads

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुलचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी महाराष्ट्र डान्सर स्पर्धा विजेत्यांची परळीकरांना मेजवानी

बीड स्पीड न्यूज 

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुलचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी महाराष्ट्र डान्सर स्पर्धा विजेत्यांची परळीकरांना मेजवानी 

परळी (प्रतिनिधी)कोविडच्या महामारीनंतर दोन वर्षांनी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुल परळी मध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची किलबिल सुरु झालेली आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर विद्यार्थी ,पालक व परळीमधील सर्व नागरिकांकरिता "परिवर्तन" या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दि. ०५ / ०३ / २०२२ रोजी सायंकाळ ६ वा दिल्ली वर्ल्ड स्कुल कॅम्पस, बीड रोड, परळी येथे केलेले आहे. विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विविध कलागुण प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. नृत्य, नाटक, गायन, फॅशन शो अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या सोहळ्यात असणार आहे. या सांस्कृतिक समारंभासोबतच अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल तसेच विविध उपक्रमातील कामगिरीबद्दल गौरवीत केले जाणार आहे.
"परिवर्तन" सोहळ्याकरिता प्रमुख अतिथी म्हणून श्री. किरण गित्ते सर (IAS , त्रिपुरा) , श्री. सुनील जयभाये (पोलीस उपाधीक्षक, अंबाजोगाई) आणि सन्मानीय अतिथी सौ. उषा गित्ते (अध्यक्षा, विवेकानंद युथ वेलफेर सोसायटी) उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र बेस्ट डान्सर विजेता "प्रथमेश माने" आणि डान्स महाराष्ट्र डान्स season 1 चे विजेता तसेच डान्स इंडिया डान्स सेमी फ़ायनलिस्ट "पुण्यकर उपाध्याय" यांचा डान्स परफॉर्मन्स असणार आहेत. यांच्याच जोडीला श्री. किरण गित्ते  आणि सौ.उषा गित्ते यांची कन्या कु.श्रेया गित्ते हिचाही विशेष परफॉर्मन्स सादर केला जाणार आहे. "परिवर्तन" महासोहळ्याकरिता दिल्ली वर्ल्ड स्कुल चे मुख्याध्यापक श्री.तेजेश कुमार तुरकर यांनी शाळेचे विद्यार्थी ,पालक तथा सर्व परळीकरांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा