Subscribe Us

header ads

पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेस विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा नोंद

बीड स्पीड न्यूज 


पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेस विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा नोंद

गेवराई-: ऊसतोडणी रोखल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेस पिस्तुलाचा धाक दाखवून विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथे गुरुवारी (दि. 25) सकाळी घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद झाला असून आरोपित एका महिलेचा समावेश आहे.सविता संतोष गर्जे (रा. संगम जळगाव) असे त्या तक्रारदार महिलेचे नाव आहे. सविता यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या शेतातील ऊसतोडणीसाठी मजुरांची टोळी आली होती. यशवंत नागरे याने त्यांना फोन करून सदर जमिनीचा वाद असून ऊसतोडणी करू नका असे बजावले. त्यामुळे वादग्रस्त उसतोडणी करण्यास नकार देत ते सर्व मजूर निघून गेले. याबाबत जाब विचारण्यासाठी सविता या यशवंत नागरेच्या घरी गेल्या. तिथे यशवंत नागरे, शिल्पा यशवंत नागरे आणि प्रभाकर साहेबराव नागरे (सर्व रा. संगम जळगाव) यांनी सदर जमिनीचा न्यायालयात वाद सुरु असल्याने आम्ही तुमचा ऊस जाऊ देणार नाही असे सांगितले. यावर आमचे नुकसान करून नका, ऊस जाऊद्या अशी विनंती केली असता त्या तिघांनी संगनमताने सविता यांना विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला. यावली सविता यांनी सुटण्यासाठी आरडाओरडा केला असता प्रभाकर नागरे याने पिस्तुळ दाखवत त्यांना धमकावले. आरडाओरडा ऐकून जमा झालेल्या इतर ग्रामस्थांनी सविता यांची त्या तिघांच्या तावडीतून सुटका केली असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा