Subscribe Us

header ads

300 आमदारांना घरे बांधून न देता त्यांचे पेन्शन सुद्धा रद्द करा -पै.आबा कळसाईत

बीड स्पीड न्यूज 


300 आमदारांना घरे बांधून न देता त्यांचे पेन्शन सुद्धा रद्द करा -पै.आबा कळसाईत 

अकलूज-:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील 300 आमदारांना मुंबईत  घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला पण या निर्णयाचा नागरिकांत तीव्र निषेध व्यक्त होत आहे.अकलूज येथील श्री विश्वकर्मा युवक संघटनेचे अध्यक्ष मा.पै.यशवंत (आबा)कळसाईत  यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेल करून घेतलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केलेली आहे व त्या आमदारांची पेन्शन सुद्धा रद्द करण्याची मागणी केलेली आहे.आपण जो निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रातील 300 आमदारांना घरे देण्याचा कृपा करून महाराष्ट्रातील जनतेचा-शेतकऱ्यांचा -गोर गरिबांचा विचार करून महाराष्ट्रातील एकाही आमदाराला घरे न देता महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेला आपल्या शेतकरी राजाला तरी घरे बांधून द्यावी ही एक "श्री विश्वकर्मा युवक संघटनेतर्फे " ही विनंती मागणी आपणांस करत आहोत. साहेब पंजाब मध्ये जसा निर्णय पंजाब चे मुख्यमंत्री श्री  भगवंत मान यांनी घेतला की सर्व माजी आमदार ,माजी खासदार, माजी मंत्री ,यांचे पेन्शन रद्द करण्याचा निर्णय आपणसुद्धा आपल्या महाराष्ट्रात घ्यावा.जेणेकरुन आपल्या महाराष्ट्र सरकार च्या उत्पन्नात वाढ होईल व त्यामधून आपल सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ शकेल. साहेब आपणावर आम्हा श्री विश्वकर्मा युवक संघटनेतील सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा भरपुर विश्वास आहे.आपण 300 आमदारांना घरे देण्याचा निर्णय रद्द करावा साहेब आपणांस हात जोडून विनंती आहे.यांना कोणती गरज आहे.साहेब घरांची आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला  गोर गरीबांना द्या.साहेब पण आमदारांना नको असेही या ईमेल मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.महाराष्ट्रातील एकही आमदार गरीब नसुन त्यांच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे.आणि बहुतांश आमदारांचे मुंबईत घरे आहेत. आपण गरीब जनतेचा विचार न करता कोट्यवधी संपत्ती असणार्या गरीब आमदारांना घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.जो की असमाधानकारक आहे.तरी साहेबांनी हा निर्णय तात्काळ रद्द करून त्यांचे पेन्शन सुद्धा रद्द करावी.
पै.आबा कळसाईत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा