Subscribe Us

header ads

एक लाख वृक्ष लागवडीसह संगोपन करण्याचा निर्धार करणारा ‘जयराम’ -विष्णु लांबा

बीड स्पीड न्यूज 


एक लाख वृक्ष लागवडीसह संगोपन करण्याचा निर्धार करणारा ‘जयराम’ -विष्णु लांबा
माणसाचे आयुष्य सुखकर करण्याचे काम वृक्ष करतात -उपजिल्हाधिकारी पवार



बीड, दि.26 (लोकाशा न्युज)ः- झाडे फक्त लावून उपयोग नाही तर ती जगवली सुद्धा पाहिजे. यामुळे पर्यावरणातील समतोल राखण्यास मदत होवू शकते. पर्यावरण संरक्षण हे आज जगासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याने बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये एक लाख वृक्ष लागवड करून त्यावृक्षांचा संगोपन करण्याचा निर्धार करणार ‘जयराम’ आज पसायदान सेवा प्रकल्पापासून सुरूवात करण्यात आले असून या मोहिमेचे उद्घाटन ट्रि मॅन ऑफ इंडिया असलेले विष्णु लांबा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले तर माणसांच्या आयुष्य सुखकर करण्याचे काम वृक्ष करत 

असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांनी व्यक्त केले.पर्यावरण संरक्षण हे आज जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. जंगलांचे अंदाधुंद शोषण, कमी होत जाणारा पर्जन्यमान अशा कारणांमुळे आपल्या जैवविविधतेची रचना विस्कळीत झाली आहे. सुशोभीकरण आणि विकासाच्या नावाखाली जंगलतोड करणार्‍या राज्यांमध्ये एके काळी वनाच्छादित असलेल्या महाराष्ट्र राज्याचेही नाव घेतले जाते. या राज्यातील बीड जिल्ह्यासारख्या महत्वाच्या भागात दुष्काळामुळे स्थानिक वृक्ष वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत. अशा परिस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जयराम पवार यांनी स्थानिक प्रजाती ओळखून त्यांचे पुन्हा जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निसर्ग आणि संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित संस्था कल्पतरू संस्थान, केपीएमजी व मित्र फाउंडेशन व परिसरातील वृक्ष पे्रमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 26 मार्च रोजी पसायदान सेवा प्रकल्प येथे प्राथमिक तत्वावर एक हजार झाडाचे लागवड करत मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख 

अतिथी म्हणून ट्रि मॅन ऑफ इंडिया विष्णु लांबा, आर.पी. सिंग, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जयराम पवार, सचिव सोमनाथ बडे, गणेश कर्‍हाळे, गोवर्धन दराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तमराव चिवटे, जीवनराव बजगुडे, जालिंदर धांडे, प्रकाश ठाकूर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी ट्रि मॅन ऑफ इंडिया विष्णु लांबा यांनी विविश वृक्षाच्या प्रजातीबद्दल माहिती दिली. तर जयराम पवार यांनी उपस्थित नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी मी तुमच्यासोबत कायम असून लावलेल्या वृक्षाचे संगोपन व्यवस्थील केल्यास भविष्याची पिढी सुखकर राहू शकते असे सांगितले. यावेळी उपस्थित अतिथींसह गावकर्‍यांना व मुलांना चहा व नाष्टा देवून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण राठोड, बीपीन डरफे, मित्र फाउंडेशनचे पंकज जोशी, जनार्धन घुमरे, रविकिरण काटकर, बिबीशन राठोड, अरूण पवार, शामभाऊ राठोड, सुरेश पवार, एकनाथ चव्हाण, कुंडलिक शिंदे यांच्यासह पसायदान प्रकल्पातील सर्व मंडळी यांनी परिश्रम घेतले.


पसायदान सेवा प्रकल्पाचे केले कौतुक


निराधान अनाथ मुलांना हक्काच घर देवून त्यांचे संगोपन करण्याचे काम पसायदान सेवा प्रकल्पाचे संस्थापकचालक गोवरर्धन दराडे व त्यांच्या पत्नी करत आहेत. आजघडीला आईवडीलांनाही आपले लेकरांचे संगोपन करतांना जिवावर जात आहे. त्यात हे दाम्पत्य निराधारांना आधार देत असून यांचे कार्य आगदी ग्रेटच आहे. जयराम पवार सर यांनी वृक्षारोपन मोहिमेची सुरवात अशा ठिकाणापासून सुरूवात केली आहे जेथे अनाथांना आधार दिला जातो. येथील वृक्षांनाही संगोपनासाठी गोवर्धन दराडे सर नाथ भेटले असून वृक्षारोपनाची मोहीम यशस्वी झाल्याचे विष्णु लांबा यांनी व्यक्त करत पसायदान सेवा प्रकल्पाचे कौतुक केले. तसेच पसायदान प्रकल्पासाठी आणि वृक्ष संगोपनासाठी पाण्याची सोय करत बोअरवेलचा संपूर्ण खर्च देवून बोअरवेल पाडून पाण्याची सोय करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा