Subscribe Us

header ads

रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात पिता-पुत्रांना अंतरिम जामिन मंजूर

बीड स्पीड न्यूज 


रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात पिता-पुत्रांना अंतरिम जामिन मंजूर


बीड_ रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात दाखल गुन्हयात बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांना बीडच्या सत्र न्यायालयाने अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. क्षीरसागर पितापुत्रांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर सुनावणी सुरु असून पुढील तारखेपर्यंत त्यांना अंतरिम जामिन मंजूर करण्यात आला आहे. पाचवे जिल्हा सत्र न्यायाधिश एस.टी.डोके यांच्या न्यायालयाने हा अंतरिम जामिन दिला आहे. पुढील सुनावणी ५ मार्चला होणार आहे.बीड येथे रजिस्ट्री कार्यालयात काही दिवसापूर्वी जमीनाच्या वादातून गोळीबार झाला होता. यात दोघे जण जखमी झाले  होते. जखमी सतीश क्षीरसागरच्या फिर्यादीवरुन दाखल गुन्हयात बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण आणि त्यांचे पुत्र योगेश क्षीरसागर यांना आरोपी करण्यात आले आहे. सोमवारी या पितापुत्रांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आणि या अर्जाची सुनावणी होईपर्यंत अंतरिम जामिनाची विनंती केली होती. त्याची सुनावणी बुधवारी सकाळी न्या. एस. टी. डोके यांच्यासमोर झाली. यावेळी न्यायालयाने भारतभुषण क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांना अंतरिम जामिन देत अटकेपासून संरक्षण दिले आहे. यात क्षीरसागर पितापुत्रांच्या वतीने अॅड मिलींद वाघिरकर, अॅड अविनाश गंडले यांनी युक्तिवाद केला, तर मुळ फिर्यादीच्या वतीने अॅड  बी डी कोल्हे यांनी अंतरिम जामिनाला विरोध केला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा