Subscribe Us

header ads

महाशिवरात्री निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने खिचडी वाटप

बीड स्पीड न्यूज 


महाशिवरात्री निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने खिचडी वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंकजाताई मुंडे आणि खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या वतीने  महाशिवरात्रीनिमित्त भाविकासाठी खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले.बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. देशभरातून लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी 

आलेल्या भाविकांच्या तोबा गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. पंकजाताई मुंडे आणि खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांसाठी खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भा.ज.पा तालुकाध्यक्ष सतीशभाऊ मुंडे,जेष्ठ नेते श्रीहरी(बाबूजी)मुंडे, श्रीरामजी मुंडे,नगरसेवक पवण मुंडे सर, रिपाई चे नेते भास्कर नाना रोडे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष संतोष सोळंके,किशोर केंद्रे,सचिन गित्ते,राजेंद्र ओझा,अरुण पाठक, राम तोष्णीवाल,अश्विन मोगरकर,योगेश पांडकर, बाळासाहेब फड,सुशील हरंगुळे,डॉ.बलविर मुंडे,सुरेश सातभाई,राजेश आघाव,नितीन मुंडे,दिपक नागरगोजे,गोविंद मुंडे,विशाल मुंडे,महादेव कंडुकटले,पवन तोडकर,कुणाल चाटे, अश्विन गित्ते,चैतन्य मुंडे,आकाश मुंडे,दिपक कराड,नकुल वाघमोडे, शुभम बदने,अमोल दहिफळे,धिरज कांदे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा