Subscribe Us

header ads

खजाना विहिर परिसरात बुलेटवर जाणाऱ्या तिघांना भरधाव बसने दिली जोराची धडक; दोघांचा जागीच मृत्यू तर गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

  खजाना विहिर परिसरात बुलेटवर जाणाऱ्या तिघांना भरधाव बसने दिली जोराची; धडक दोघांचा जागीच मृत्यू तर गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू 



बीड दि. 2 _ बुलेटवर जाणाऱ्या तिघांना भरधाव बसने जोराची धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी तरुणास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पाली परिसरातील नक्षत्र हॉटेलसमोर बुधवारी (दि.2) रात्री 7 च्या सुमारास झाला.पारसनाथ मनोहर रोहिटे (वय 22 रा. आहेरवडगाव ता. बीड), कृष्णा भारत शेळके (23 रा. दगडी शहाजानपूर ता. बीड), अक्षय सुरेश मुळे (22 रा.घोडकाराजुरी ता. बीड) अशी 

मयतांची नावे आहेत. हे तिघे बुधवारी रात्री आहेरवडगाव येथून बीडकडे बुलेटवरुन (एमएच-23 एल-7227) येत होते. यावेळी धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांना समोरुन आलेल्या भरधाव बसने (एमएच-14, बीटी- 2455 ) जोराची धडक दिली. यामध्ये पारसनाथ व कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अक्षयचाही मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोह. प्रल्हाद चव्हाण, आनंद मस्के, पोशि.रवि सानप व चालक कृष्णात बडे यांनी धाव घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा