Subscribe Us

header ads

महसूल प्रशासन व पिंपळनेर पोलिस प्रशासनच्या आशीर्वादाने आडगाव येथे वाळू उपसा सुरूच; नागपूर बुद्रुक येथे गावकऱ्यांनी पकडले वाळूने भरलेले दोन टिप्पर

बीड स्पीड न्यूज 


 महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन च्या आशीर्वादाने आडगाव येथे वाळू उपसा सुरूच;  नागपूर बुद्रुक येथे गावकऱ्यांनी पकडले वाळूने भरलेले दोन टिप्पर



वाकनाथपुर प्रतिनिधी_गेवराई वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे मागील काही दिवसापूर्वी उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती.  ही घटना ताजी असताना वाळूमाफियांनी अजून आपले डोके वर काढले आहे.आज दि 3  रोजी आडगाव येथून  वाळूने भरलेले दोन टिप्पर नागपूर बुद्रुक येथे गावकऱ्यांनी पकडले हे पकडलेले टिप्पर बद्दल गाडीच्या ड्रायव्हरला माहिती विचारली असते तो ड्रायव्हर उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला नंतर त्याला 

विचारलं असतं हा टिप्पर पोलीस कर्मचार्‍याचा आहे. असे त्या टिप्पर ड्रायवरने सांगितले. याबद्दलची माहिती मंडळ अधिकारी यांना देण्यात आली मंडळ अधिकारी यांनी फोनवरून गावकऱ्यांना सांगितले याची माहिती तुम्ही तलाठी पोलीस प्रशासनाला द्या मंडळाधिकारी स्पॉटवर ना येता फोनवर आदेश देऊ लागले महसूल प्रशासनचा व पिंपळनेर पोलिस स्टेशनचा कोणताही अधिकारी त्या स्पॉटवर न आल्याने वाळूने भरलेले ते दोन्ही टिप्पर पळून 

गेले.महसूल अधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी, आणि  पिंपळनेर पोलीस प्रशासन,  फक्त बघायची भूमिका घेत आहे. मग या वाळू माफियांच्या विरोधात कारवाई कोण करणार आहे.?? मंडल अधिकारी. तहसीलदार महसूल विभाग. पोलीस प्रशासन हे वाळू माफियांचा पाठराखण करण्यासाठीं आहे का.? या सर्व अधिकाऱ्यांचा हलगर्जी पणाने वाळू माफिया विना रॉयल्टी पावतीची बिनधास्तपणे वाळू उपसा करीत आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी या सर्व अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी गावकरी करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा