Subscribe Us

header ads

केमिकल पासून दुध तयार करणाऱ्या एकास रंगेहाथ पकडले; सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावतांच्या पथकाची कारवाई

बीड स्पीड न्यूज 
 


केमिकलपासून दुध तयार करणाऱ्या एकास रंगेहाथ पकडले

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावतांच्या पथकाची कारवाई

पाटोदा-:  केमिकलपासून तयार - केलेल्या दुधाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या एकास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यावेळी १६० लिटर केमिकलयुक्त दुध आणि केमिकल पावडर जप्त करण्यात आली. ही कारवाई पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी येथे शुक्रवारी (दि. २५) सकाळी सात वाजता करण्यात आली.अधिक माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील मौजे नागेशवाडी येथील आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हा व्यक्ती केमिकल पावडर पासून दूध तयार करून तो दूध त्याचे जवळील दुधामध्ये मिक्स करून दूध डेअरीवर विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. आहे. त्यानुसार पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार व अन्न भेसळ अधिकारी यांनी सदर ठिकाणी जाऊन शुक्रवारी सकाळी ७ वाजता छापा मारला. सदर ठिकाणी वरील इसम हा आपले राहते घरी केमिकल पावडर पासून दूध तयार करत असताना तयार केलेले १६० लिटर दूध व केमिकल पावडर व दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा