Subscribe Us

header ads

सुडाचे राजकारण लोकशाहीला घातक : डॉ. नंदकुमार उघाडे

बीड स्पीड न्यूज 


सुडाचे राजकारण लोकशाहीला घातक : डॉ. नंदकुमार उघाडे


बीड / प्रतिनिधी_सध्या देशात सुरू असलेले सुडाचे राजकारण दिशाहीनतेच्या मार्गावर आरूढ झाले आहे. यातून दुसरे काही नाही सत्तापिपासू पणाचे दर्शन घडत आहे . गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून त्या व्यक्तीला सजा झालीच पाहिजे यात कसलेही दुमत नाही . मात्र ती चौकशी सूडबुद्धीने झालेली नसावी. फक्त विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना ईडीचा (सक्तवसुली संचालनालय ) बडगा दाखवून त्यांची ससेहोलपट करू नये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याप्रमाणेच छगन भुजबळ , अनिल देशमुख , सुरेश कलमाडी यांनाही तपास यंत्रणेच्या कचाट्यात अडकवले . गैरव्यवहार करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी व्हावी फक्त विरोधकांची नाही. महाराष्ट्राच्या मागे हात धुऊन लागलेली तपास यंत्रणा गुजरात मध्ये एवढा बँक घोटाळा होऊनही मूग गिळून का बसली आहे. पी व्ही नरसिंह राव यांच्या काळात घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताला तुरुंगाची हवा खावी लागेली .  शेवटी तुरुंगातच त्याचे निधन झाले. मोदी सरकारच्या काळात घोटाळे करणारे विजय मल्ल्या, निरव मोदी , भूपेश जैन ही मंडळी कुठे आहेत ? यांच्या पाठीशी कोण आहे ? ये बी जी शिपयार्ड च्या मास्टर माईंडकडे डोळेझाक का केली जात आहे? भारतातून परदेशात गेलेला काळा पैसा भारतात आणू असे म्हणत निवडणूक लढवून सत्तेत आले . भारतातून परदेशात गेलेला पैसा भारतात परत आणला नाहीच उलट यांच्या काळात भारतातून सर्वाधिक पैसा परदेशात गेला म्हणावे लागेल . मोदी सरकारच्या काळात 2018 - 19 या एकाच आर्थिक वर्षात 72 हजार कोटींहून अधिक घोटाळे झाल्याचे उघडकीस आले.  यातील किती जणांना पकडून त्यांना सजा देण्यात आली हे एकदा सरकारने सांगावे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.‌ आपले अपयश झाकण्यासाठी इतर लोक दोषी आहेत हे दाखवण्यात भाजपा धन्यता मानत आहे. 2014 पासून कोणत्या विकासात्मक योजना राबवल्या ते दाखवा. सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावून देशाची प्रगती साधण्यासाठी काय केले हे सांगण्यासाठी भाजपाकडे काहीच नाही. मात्र भाजपा सत्तेत आल्यापासून त्यांनी काय केले हे सांगण्यासाठी जनतेकडे खूप काही आहे. नोकरीचे प्रमाण कमी,  बेरोजगारीत वाढ , खाद्य तेलाची किंमत प्रति लिटर 60 रुपये होती ती 170 रुपये झाली , पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर होते ते 116 रुपये प्रति लिटर झाले, स्वयंपाकासाठी वापरला जाणारा घरगुती गॅस सिलेंडर चारशे रुपये ला होता तो यांच्या काळात 900 रुपयांच्या पुढे गेला.  महागाई गगनाला भिडली , खाजगीकरण झपाट्याने सुरू आहे . शैक्षणिक क्षेत्राची वाताहात झाली आहे . असे खूप काही तुम्हाला सांगण्यासाठी आणि सत्तेवरून पायउतार करण्यासाठी जनतेकडे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा