Subscribe Us

header ads

पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला 40 हजारांच्या लाच प्रकरणी एसीबीने केली अटक

बीड स्पीड न्यूज 

पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला 40 हजारांच्या लाच प्रकरणी एसीबीने केली अटक 


पाटोदा_पाटोदा येथे एका पीएसआयला सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली. पण तिसऱ्याच दिवशी त्याला एसीबीने लाचखोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली. त्यामुळे पदोन्नतीच्या आनंदावर विरजण पडलं आहे.अफरोज तैमीरखां  पठाण (36) यांची सहायक निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. राज्यातील उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी पदोन्नतीसाठी महसूल विभागाचे वाटप करुन पसंती क्रमांक मागविलेले आहेत. याची यादी 9 मार्च रोजी अपर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली. या यादीत अफरोज पठाण यांचेही नाव असल्याने सध्या त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू होता. या पदोन्नतीच्या तीन दिवसातच त्यांनी लाच मगितल्याच्या आरोपातून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पदोनत्तीच्या आनंदावर तीन दिवसातच विरजण पडलं आहे.एका जबरी लुटीच्या गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल आणि आरोपीस अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी संबंधितांकडे केली होती. या प्रकरणी तडजोड अंती 40 हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज तैमीरखां पठान याना लाचलूचपत विरोधी विभाग-एसीबीने अटक केली आहे.अफरोज तैमीरखां पठान हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्यावर होते. त्यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रादाराच्या भावास अटकपूर्व जामीन मंजूर करून गुन्ह्यात वापरलेली जप्त गाडी व पिस्टल सोडविण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याच प्रकरणात 40 हजार रुपये घेताना आपल्यावर कारवाई होणार असल्याचा संशय आल्याने उपनिरीक्षक पठाण यांनी ही लाच स्वीकारली नाही. या प्रकरणी एसीबीने सखोल चौकशी केली असता पठाण यांनी लाच मगितल्याच मान्य केल्याने अखेर एसीबीने त्यांना लाच मगितल्याच्या आरोपाखाली अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा