Subscribe Us

header ads

भाजी मंडई होणार सुसज्ज,समस्यांचा बाजार संपणार नगर विकास विशेष निधीअंतर्गत ५ कोटी मंजूर आ.संदीपभैय्यांचा संकल्प मार्गी

बीड स्पीड न्यूज 


भाजी मंडई होणार सुसज्ज,समस्यांचा बाजार संपणार
नगर विकास विशेष निधीअंतर्गत ५ कोटी मंजूर आ.संदीपभैय्यांचा संकल्प मार्गी



बीड (प्रतिनिधी):- शहरातील भाजी मंडई परिसरात सध्या घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य आहे.मंडईतील अधिकृत ओट्यांची अवस्था उकंड्यासारखी झाल्यामुळे विक्रेते भाजीपाला विक्रीसाठी थेट रस्त्यावर बसत आहेत.त्यामुळे या भागात भयंकर वाहतूक कोंडी होत आहे.भाजी मंडईत गेल्यानंतर नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता.त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष निधीअंतर्गत ५ कोटींचा निधी भाजी मंडईच्या विकासासाठी मंजूर करून आणला असून लवकरच भाजी मंडईचे नुतणीकरण,आधुनिकीकरण होऊन सुसज्ज होणार आहे.आ.संदीप क्षीरसागर यांचा,शहरातील नागरिकांना स्वच्छ व निर्जंतुक वातावरणातील निरोगी भाजीपाला मिळवून देण्याचा संकल्प मार्गी लागला आहे.शहरात नवीन भाजी मंडई संस्कार विद्यालय परिसर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या दोन ठिकाणी मुख्यतः बाजार भरतो. भाजी विक्रीसाठी तालुक्यातून दररोज शेतकरी आणि व्यापारी येतात परंतू नव्या भाजी मंडईत नगरपरिषदेने बांधलेल्या ओट्यांची दुरावस्था सध्या उकंड्यासारखी  झाली आहे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी मंडईत कसल्याही प्रकारची सुविधा नसल्याने विक्रेते थेट आपली दुकाने रस्त्यावरच मांडतात.दोन्ही भाजी मंडईतून जाणारा रस्ता अगोदरच अरूंद आहे त्यात भाजी विक्रेते संध्याकाळी उरलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून देतात त्यामुळे याठिकाणी मोकाट जनावरे सतत बसलेले असतात.रस्त्यावरील दुकाने,रस्त्यावर बसलेले जनावरे यांच्यामुळे या भागात सतत भयंकर वाहतूक कोंडी होते. रस्त्यावर फेकून दिलेल्या भाजीपाल्याला दुर्गंधी सुटते.दोन्ही मंडईत कचरा आणि घाणीचेच साम्राज्य सध्या दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांना एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या या समस्या जाणून घेत आ.संदीप क्षीरसागर, भाजी मंडईच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे बऱ्याच दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते, शेवटी शुक्रवारी (दि.११) रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मंडईच्या विकासकामांचा प्रस्ताव मंजूर करून विशेष निधीअंतर्गत ५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश आले.या निधीअंतर्गत महात्मा फुले नवीन भाजी मंडई संस्कार विद्यालय परिसर नुतनीकरणासाठी ३ कोटी तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी मंडईसाठी २ कोटी इतका निधी खर्च केला जाणार असून बीड शहरातील दोन्ही भाजी मंडई घाणीचा विळखा तोडून लवकरच मोठ्या शहरांप्रमाणे आधुनिक होणार आहे.बाजारात ग्राहकांना भाजीपाला स्वच्छ व निर्जंतुक मिळण्यासाठी नियोजन केले जाणार असून लवकरच भाजी मंडई सुसज्ज होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा