Subscribe Us

header ads

दि इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी, अंबाजोगाईचे आदर्श शिक्षक आणि आदर्श प्रशासक पुरस्कार जाहीर

बीड स्पीड न्यूज 


दि इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी, अंबाजोगाईचे आदर्श शिक्षक आणि आदर्श प्रशासक पुरस्कार जाहीर

अंबाजोगाई (प्रतिनिधी) सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडावा या उद्देशाने काम करणारी दि इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी, अंबाजोगाई ही संस्था गेल्या चार वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेकडून दिला जाणारा या वर्षाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक आणि राष्ट्रीय आदर्श प्रशासक पुरस्कार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर, औरंगाबाद येथे संपन्न होणाऱ्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत दिला जाणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव प्रा. डॉ. रमेश लांडगे तथा परिषदेचे आयोजक प्रा.डॉ. महेश वाघमारे यांनी नुकतीच पत्रकारांशी बोलताना दिली.प्रशासकीय सेवेत काम करत असताना प्रशासन आणि माणुस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजून प्रशासन व्यवस्था सांभाळणारे प्राचार्य डॉ. एच. जी. विधाते (आनंदराव धोंडे 

महाविद्यालय, कडा ता. आष्टी जि. बीड) यांना राष्ट्रीय आदर्श प्रशासक तर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक प्राध्यापकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामधे प्रा. डॉ. माधवी निकम (आर. के. तलरेजा महाविद्यालय, उल्हासनगर, ठाणे.), प्रा. डॉ. गणेश मोहिते (बलभीम महाविद्यालय, बीड) प्रा  डॉ. अनिल कट्टे (के. एम.जे. महाविद्यालय वाशी, उस्मानाबाद), प्रा. प्रमोद डेंगळे (डॉ. टी. के. टोपे महाविद्यालय, मुम्बई ), प्रा. डॉ. बालसुब्रमण्यम पद्मनाभन (भारतीयार युनिव्हर्सिटी, कोयमतुर, तामिळनाडू ) आणि प्रा. मनीषा पाटील (पारुल युनिव्हर्सिटी, वडोदरा, गुजराथ) यांचा समावेश आहे.

चौकट

२३ मार्च २०२२ रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत येणारे सर्व संशोधनात्मक पेपर यूजीसी केअर लिस्तेड जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत असे आयोजक यावेळी म्हणाले. सर्व संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक बंधू-भगिनींनी दिनांक १५ मार्च २०२२ पूर्वी आपले लेख संपादकीय मंडळाकडे पाठवावे असे आवाहनही परिषदेचे आयोजक प्रा महेश वाघमारे यांनी केले आहे.


चौकट

दि इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला याचा मनस्वी आनंद आहे. तरुण मित्रांनी या सोसायटीच्या माध्यमातून उत्तम शैक्षणिक,सामाजिक कार्य उभे केले आहे.सातत्यपूर्ण विविध उपक्रम ते घेत असतात.समाजात काम करणाऱ्या चांगल्या माणसांचा सन्मान ते करतात ही गोष्ट महत्वपूर्ण आहे.

या सन्मानासाठी माझी निवड केली यासाठी संयोजकांना धन्यवाद देतो.

-प्रा.डाॅ.गणेश मोहिते,
उपप्राचार्य, बलभीम महाविद्यालय, बीड

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड होणे ही माझ्यासाठी मनोबल वाढविणारी व प्रेरणा देणारी गोष्ट आहे. दी इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटीने दिलेला हा सन्मान शैक्षणिक कार्यासाठी व संशोधनासाठी निश्चितच बहुमोल आहे. (मनिषा पाटील-पारूल युनिव्हर्सिटी वडोदरा गुजराथ)

    उत्तर द्याहटवा
  2. Hearty Congratulations! to All the Respected Awardiees.

    उत्तर द्याहटवा
  3. All the Best! to the English Educators’ Society, Ambajogai for the One Day International Interdisciplinary Conference on the Eve of 75th Anniversary of Indian Independence on the Topic:' Nation & Narrations: Inquiries into History, Politics, Society, Culture, Literature and Democracy'

    उत्तर द्याहटवा

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा