Subscribe Us

header ads

पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत म्हाळस जवळा येथे चोरी

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत म्हाळस जवळा येथे चोरी


वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड जिल्हात कायद्याचा कोणाला ही धाक राहिलेला नाही आणि पिंपळनेर पोलीसांचा तर कोणालाही धाक राहिलेला नाही पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हमेशा चोरीच्या घटना घडत आहे.राक्षस भुवन (देवीचे) येथील राहणारे नवनाथ लोणकर यांचे म्हाळस जवळा येथील फाट्यावर कृष्णा किराणा स्टोअर्स आणि फौजी स्वीट होम असे दोन दुकाने आहेत याचं फौजी स्वीट होम मध्ये आज दिनांक १० मार्च वार गुरुवार च्या रात्री अज्ञात चोरट्याने फौजी स्वीट होम समोर येऊन अगोदर बाहेर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला नंतर 

चोरट्याने छंन्नी आणि टांबी च्या साह्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आत मध्ये प्रवेश करताच त्याला चोरी करण्यासाठी काहीही मिळाले नाही रागात त्यांनी काही खाण्याच्या वस्तु घेऊन निघाला परत वापस येऊन स्वयंपाकासाठी वापरला जाणारा  गॅस सिलेंडर घेऊन बाहेर पडला बाहेर पडताच बाजूला बसून खाण्याच्या पदार्थ मधी काही खाल्ले आणि बाकीचे तेथेच सोडून गॅस सिलेंडर घेऊन पोबारा केला कृष्णा लोणकर यांनी अज्ञात चोरटा विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आता सीसीटीव्ही फुटेज च्या आधारावर पिंपळनेर पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा