बीड स्पीड न्यूज
दिनांक 12 मार्च 2022 रोजी केज न्यायालयात राष्ट्रीय लोकदालतचे आयोजन
केज_मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांचे आदेशानुसार दिनांक 12 मार्च 2022 रोजी तालुका विधी सेवा समिती केज व वकील संघ केज यांच्या सयुंक्त विद्यमाने येथे दिवाणी न्यायालय क. स्तर केज येथे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रकरणे, एम. एस.ई. बी., बी. एस. एन.एल., नगर परिषद व केज येथील सर्व बँका यांची दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश असून सदर लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी भाग घ्यावा तसेच कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे सामाजिक अंतर ठेवून व प्रत्येकाने मास्कचा वापर करून सहभागी व्हावे व जास्तीत जास्त प्रकरणे आपसातील तंटे मिटवून घेण्याबाबत दिनांक 12मार्च रोजी सकाळी 10 : 30 वाजता दिवाणी न्यायालय क. स्तर केज येथे होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन श्रीमती मनिषा थोरात मॅडम, दिवाणी न्यायाधीश क. स्तर केज यांनी केले आहे.
0 टिप्पण्या