Subscribe Us

header ads

परळीत म.ज्योतिबा फुलेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा ;परळी तालुका ओबीसी सेलची पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी

बीड स्पीड न्यूज 




परळीत म.ज्योतिबा फुलेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा ;परळी तालुका ओबीसी सेलची पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी   

परळी /प्रतिनिधी-: समस्त ओबीसी समाजाचे दैवत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा परळी शहरात बसवण्यात यावा अशी मागणी परळी तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिन अरसुडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.परळी शहर हेबाराज्योतिर्लिंगा पैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर विज निर्मिती केंद्र अशी ओळख असलेल्या परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाबाई, राजमाता अहिल्याबाई, असे अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत परंतु ओबीसी आणि माळी समाजाचे दैवत शिक्षण महर्षी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची उणीव भासत आहे. विशेष म्हणजे परळी शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने जुने भाजी मंडई आणि आजचे वैजनाथ बाजार या इमारतीच्या शेजारी नगरपरिषदेचे मोकळी जागा आहे. या जागेवर महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडई ही अस्तित्वात आणावी अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सचिन अरसू डे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे परळी शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा भरण्याचा निर्णय घेतात का याकडे संपूर्ण ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा