Subscribe Us

header ads

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे यांचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 


धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे यांचा मृत्यू

बीड-:बीड कडून लिंबागणेश येथे गावी दुचाकीवरून जात असतांना दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे (वय 40 वर्षे ) यांच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता बीड- मांजरसुंबा महामार्गावरील हॉटेल बळीराजासमोरील मंझेरी फाटा येथे घडला.शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे रा. लिंबागणेश  हे शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता बीडहुन लिंबागणेश हे त्यांच्या गावी दुचाकी एम.एच.23 ए.व्ही 0017  जात होते. वाटेत बीड- मांजरसुंबा महामार्गावर मंझेरी फाट्यावरील हॉटेल बळीराजा समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळुन डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस पीएसआय डी. बी आवारे, जमादार आनंद मस्के, मदतनीस जी. व्ही. कांदे वाहनचालक खय्युम खान यांच्यासह महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी भेट देवुन पाहणी केली. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रूग्णालयात भेट देवुन परिस्थीती जानुन घेतली. पोलिसांनी गणेश मोरे यांचा मृतदेह ताब्यात घेवुन तो बीड जिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मोरे यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा