Subscribe Us

header ads

बीड शहराला मिळणार आठवड्याला पाणी आ.संदीप क्षीरसागरांनी भर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न सोडवला

बीड स्पीड न्यूज 

बीड शहराला मिळणार आठवड्याला पाणी आ.संदीप क्षीरसागरांनी भर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न सोडवला



बीड (प्रतिनिधी):- विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी व जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.संदीप भैय्या अहोरात्र प्रयत्न करत आहेत. याअनुषंगाने काही दिवसांपूर्वी  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार, नगर विकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा करून बैठक घेतली होती. या बैठकीत अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी येणार्‍या अडचणींवर निर्णय झाला. त्यानुसार संबंधित विभागांना निर्देश मिळाले. त्यानंतर आ.संदीप क्षीरसागर यांनी ही कामे प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांच्यासोबत संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेवून, असलेल्या अडचणींचा आढावा घेवून कामे सुरू करणे बाबत निर्देश दिले होते. या अनुषंगाने आज दि.1 मार्च 2022 रोजी स्वत: आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकार्‍यांसोबत जावून काडीवडगाव प्रकल्प व ईट जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी करून कामाला सुरूवात केली. आत्तापर्यंत बीड शहराला माजलगाव बॅक वॉटरमधून 24 एमएलटी इतके पाणी मिळत होते. यासोबतच बिंदूसरा प्रकल्पातून 6 एमएलटी इतका पाणी पुरवठा बीड शहराला होत होता. परंतू आता वाढत्या लोकसंख्येमुळे बीड शहराला मुबलक व नियमीतपणे पाणी मिळावे यासाठी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यापुर्वी काडीवडगाव येथे 150 एचपीच्या तीन पंपाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतू लोकसंख्येच्या आणि बीड शहराच्या उपयुक्ततेच्या मानाने हा होणार पुरवठा मुबलक आणि नियमित नव्हता. शहरातील गावठाण भागात 10 दिवसाला तर हद्दवाढ भागात पंधरा दिवसाला पाणी मिळत होते. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल चालले होते. म्हणून आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी पाण्याचा मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी काडीवडगाव प्रकल्प येथे एक अतिरिक्त 495 एचपीचा पंप बसवून अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा होईपर्यंत बीड शहराला किमान सात दिवसाला पाणी मिळेल याची व्यवस्था केली आहे. येत्या पंधरा दिवसाच्या आत म्हणजेच उन्हाळ्याच्या तोंडावर शहराला नियमितपणे आठवड्यातून एकदा नियमितपणे पाणी मिळणार आहे. यामुळे बीड शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा बर्‍याच प्रमाणात सुरळीत होणार आहे. काडीवडगाव प्रकल्प व ईट जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करतांना आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या समवेत माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, न.प.चे मुख्याधिकारी, एमजीपीचे सर्व अधिकारी आदी उपस्थित होत. 

आ.संदीपभैय्यांची शब्दपुर्ती

काही दिवसापूर्वी शाहुनगर भागात अनेक युवकांनी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला होता. या प्रवेश कार्यक्रमाच्या वेळी संदीप भैय्यांनी बोलतांना या 

भागातील नाल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असा शब्द दिला होता. मंगळवार दि.1 मार्च रोजी प्रभाग क्र.9 मधील हनुमान मंदिर ते सम्राट चौक व राणुबाई माता मंदिर येथील नाली बांधणीच्या कामाचा शुभारंभ संदीप भैय्या 

क्षीरसागर यांनी केला. दिलेला शब्द अवघ्या काही दिवसातच नाली कामांचा शुभारंभ करून पुर्ण केला. विशेष म्हणजे यावेळी कामाचा शुभारंभ हा कार्यकर्त्यांच्या हस्ते केल्यामुळे कार्यकर्ते व या भागातील नागरिकांचा आ.संदीप भैय्यांवर असलेला विश्वास आणि आपुलकी आणखी मजबुत झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा