Subscribe Us

header ads

अचानक झोपडीला आग लागल्याने शेतकऱ्याच्या २ लाख रुपये सहा ५ शेळ्यांचा होरपळून मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

अचानक झोपडीला आग लागल्याने शेतकऱ्याच्या २ लाख  रुपये सहा ५ शेळ्यांचा होरपळून मृत्यू 

कडा_ अचानक झोपडीवरील छपराला आग लागल्याने एका शेतकऱ्याची  दोन लाख रुपये सहा जळून राख झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वाहिरा येथील शेतवस्तीवर घडली. आगीत ५ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख रुपये आणि संसारोपयोगी वस्तू देखील जळाल्याने शेतकऱ्याचा मोठा नुकसान झाला आहे.वाहिरा येथील शेतकरी महमंद शेख गावापासून जवळ असलेल्या शेतातील झोपडी च्या एका घरात पत्नी आणि मुलीसह राहतात. सोमवारी रात्री जेवणकरून शेख कुटुंब झोपी गेले. रात्री साडे अकराच्या दरम्यान अचानक झोपडीच्या छपराला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच शेख कुटुंबाने प्रसंगावधान राखत लागलीच बाहेर धाव घेतली. काही क्षणात संपूर्ण झोपडी जळून खाक झाली.या आगीत २ लाख रुपये जळून राख झाली. तसेच ५ शेळ्याही होरपळून मृत्यु झाला आहे. काही क्षणात संपूर्ण झोपडी जळाल्याने यात संसारउपयोगी वस्तु, धान्य देखील जळून राख झाले. शेख यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. महसूल विभागाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशाने लागली हे अद्याप समजू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा