Subscribe Us

header ads

बीड मतदार संघाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर आ. क्षीरसागर आक्रमक; पोलीस अधिक्षकाची चौकशी करून योग्य ती कारवाई पंधरा दिवसात होणार-गृहमंत्री

बीड स्पीड न्यूज 

बीड मतदार संघाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर आ. क्षीरसागर आक्रमक

पोलीस अधिक्षकाची चौकशी करून योग्य ती कारवाई पंधरा दिवसात होणार-गृहमंत्री


बीड (प्रतिनिधी):- गेल्या काही महिन्यांपासून पूर्ण जिल्हा बरोबरच बीड मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात गंभीर झाला आहे. याच कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आ.संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत आवाज उठवला. यावेळी आ. संदीप क्षीरसागर म्हणाले की, मागील काही महिन्यांपासून बीड मतदारसंघातील गुन्हेगारीचे स्वरूप हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे इतकेच नव्हे तर मटका, क्रिकेटवर लागणारा सट्टा, वेश्या व्यवसाय व पत्त्याची क्लब, अवैद्य वाळू यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या पोलीस अधिक्षकावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी असा मुद्दा त्यांनी सभागृहामध्ये उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, या संबंधित असणाऱ्या पोलीस अधीक्षकांची चौकशी करून त्याचा अहवाल पंधरा दिवसात मागून घेण्यात येईल व त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. संदीप क्षीरसागर यांच्या या लक्षवेधी मुळे बीड शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.बीड मतदारसंघात निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा संदर्भात यापूर्वी देखील अनेक तक्रारी गृहमंत्र्यांकडे केल्या होत्या परंतु तरीदेखील यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. गृहमंत्र्यांनी सूचना देऊन देखील बीडचे पोलीस अधीक्षक या कोणत्याही प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. आणि त्यामुळेच गुन्हेगारांच्या मनामध्ये पोलीस प्रशासनाबद्दल कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही व त्यामुळे असे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. क्रिकेटवर लागणारा सट्टा सध्या महत्त्वाचा विषय बंद आहे अशा सट्टा मध्ये वसुलीसाठी लोक नागरिकांच्या घरापर्यंत जात आहेत व त्यातूनच आत्महत्येचे प्रकार देखील बीड मतदारसंघात वाढत आहेत. बीड मतदारसंघात वाढत असलेल्या अशा गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक सध्या जीव मुठीत धरून जगत आहे व अशा परिस्थितीला आळा घालण्यासाठी अकार्यक्षम ठरलेल्या पोलीस अधीक्षकांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा