Subscribe Us

header ads

आदर्शवत: टोकवाडी येथे डॉ. राजाराम मुंडे यांनी स्वखर्चातून बांधून दिले 51 शौचालये !जि.प.अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट यांच्या हस्ते झाले लोकार्पण

बीड स्पीड न्यूज 


आदर्शवत: टोकवाडी येथे डॉ. राजाराम मुंडे यांनी स्वखर्चातून बांधून दिले 51 शौचालये !

जि.प.अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट यांच्या हस्ते झाले लोकार्पण


परळी वैजनाथ, प्रतिनिधी_टोकवाडी येथे श्री.वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजाराम मुंडे यांनी स्वखर्चाने गावातील गरजुंना ५१ वैयक्तिक शौचालये बांधून दिले आहेत.या उपक्रमाचा लोकार्पण समारंभ जि.प.अध्यक्षा सौ.शिवकन्याताई सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त गावातील कार्यतत्पर महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी जि.प.अध्यक्षा सौ.शिवकन्याताई सिरसाट यांनी टोकवाडी ग्रामपंचायत च्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची पाहणी केली.या सर्व कामांचे त्यांनी भरभरुन कौतुक केले.श्री वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजाराम मुंडे यांनी स्वखर्चातून टोकवाडी येथील 51 गरजूंना वैयक्तिक शौचालय बांधून दिले आहेत. श्री वरद गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी टोकवाडी 

फेस्टिव्हल साजरा केला जातो परंतु गेल्या तीन वर्षात टोकवाडी फेस्टिवल साजरा न करता त्याचा खर्च तसेच आपले वडील कै. लक्ष्मणराव शामराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात येणारा खर्च हा त्यांनी लोकोपयोगी कार्यासाठी उपयोगी आणला. एकूण पाच लाख 75 हजार रुपये खर्च करून त्यांनी गरजूंना शौचालयाची सुविधा निर्माण करुन दिली. लोक सहभागातून गाव विकास ही संकल्पना राबविण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. या उपक्रमामुळे स्वच्छ भारत मिशन च्या उपक्रमाला तसेच हागणदारी मुक्त गाव या संकल्पनेला मोठी मदत मिळाली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीला सुद्धा त्यामुळे मोठा सहकार्य मिळाले आहे. यामध्ये एक सार्वजनिक शौचालय सुद्धा उभे करण्यात आले आहे. या उपक्रमाचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शिवकन्या ताई सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सरपंच सौ गोदावरी राजाराम मुंडे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, शिवाजीराव शिरसाट, डॉ. भरत मुंडे, स्वच्छ भारत मिशन चे समन्वयक राहुल दुबे, श्री. शेख तसेच उपसरपंच सौ उषाताई सुरेश रोडे, प्रा शरद रोडे, माधवराव मुंडे, दशरथ आबा मुंडे, आश्रुबा काळे, ग्रामपंचायत सदस्य सौ कल्पना मुंडे, नामदेव मुंडे, लहुदास मुंडे, सुरेश रोडे, तुकाराम काळे, सुनील मुंडे, संतोष मुंडे , अंगणवाडी सुपरवियजर सौ.देशमुख मॅडम यांची उपस्थिती होती.यावेळी सौ. 

शिवकन्याताई सिरसाट यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यामध्ये आर ओ वाटर युनिट, मोफत पिठाची गिरणी व ग्रामपंचायत कार्यालय, डिजिटल जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आदींचे भरीव काम बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे गावचा कारभार एखाद्या महिलेच्या हाती असेल तर किती प्रगती होऊ शकते याचे उत्तम उदाहरण सरपंच सौ.गोदावरीताई मुंडे यांच्या माध्यमातून दिसुन येते असा गौरव त्यांनी केला. यावेळी बालाजी पिंटू मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास गावातील डी. डी. आघाव, पंडित रोडे, सोमनाथ मुंडे, शिवाजीराव गित्ते, हनुमंत मुंडे,शाम आघाव, चाटे सर,संतोष पारधे, भारत मुंडे, भागवत मुंडे, सुरेश मुंडे, वैजनाथ अप्पा सुगरे, सोमनाथ भांगे ,उत्तम मुंडे, राजाभाऊ मुंडे,मदन नाना काळे,गंपू पारधे, नागनाथ पारवे, विश्वनाथ मुंडे,वसंत भांगे, सोमनाथ घुले,अंगद काळे,काचे सर,लक्ष्मण मुंडे यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, वरद गणेश मंडळ सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाम आघाव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजाराम मुंडे यांनी केले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा