Subscribe Us

header ads

तृथीयपंथी सपना आणि बाळूचं विवाह सोहळा बीडमध्ये संपन्न;विवाह सोहळ्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

बीड स्पीड न्यूज 


तृथीयपंथी सपना आणि बाळूचं विवाह सोहळा बीडमध्ये संपन्न;विवाह सोहळ्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी


बीड प्रतिनिधी_बीड जिल्ह्यात काही महिन्यापासून तृतीयपंथी सपना आणि ढोलकी वादक बाळूचं प्रेम प्रकरण गाजत आहे. आज या प्रेमाला मूर्त स्वरुप मिळालं. दोघंही लग्नाच्या पवित्र नात्यात बांधले गेले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बाळू आणि सपना 

विवाहबंधनात अडकले. जिल्ह्यातील अनेक मान्यवर, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती.शाही लग्नाला देखील लाजवेल असा विवाह सोहळा बीड जिल्ह्यातील कंकालेश्वर मंदिरात पार पडला. हा विवाह तृतीयपंथीयांचा असून देखील या विवाहात 

सगळे विधी पार पाडण्यात आले. हळद, मंगलाष्टिका, मानपमान, साग्रसंगीत जेवण, अशा सगळ्या गोष्टींनी विवाह सोहळ्याची रंगत वाढली. लग्नामध्ये फक्त बीड जिल्ह्यामधूनच नाही तर आसपासच्या जिल्ह्यामधून देखील लोक आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील किन्नर 

समाजातील धर्मगुरु आवर्जून उपस्थित राहिले.
लग्न सोहळ्यासाठी बीडच्या सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनीच सपनाचं कन्यादान केलं. हा विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. विवाहाला उपस्थित मंडळींनी बाळू 

सपनासोबत फोटो काढले. अधिकाऱ्यांना देखील सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.सामाजिक कार्यकर्ते सतीश भोसले यांनी सपनाला सोन्याचं मंगळसूत्र देऊन बाळू सपनाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या 

विवाहाला पाठबळ देत विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न केला.सपना आणि बाळू मागील अडीज वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. यादरम्यान त्यांनी एकमेकांना समजून घेतलं. समाजातल्या रुढी परंपरांना झुगारुन आपण लग्न करु शकतो, असा विश्वास आल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बाळू सपना विवाहबंधनात अडकले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा