Subscribe Us

header ads

गेवराईत तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला; सपासप वार करुन हल्लेखोर पसार!

बीड स्पीड न्यूज 


गेवराईत तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला; सपासप वार करुन हल्लेखोर पसार!


गेवराई_  एका ३४ वर्षीय तरुणावर आज्ञात तीन जणांनी  तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला सपासप वार करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. हि घटना गेवराई जवळील जातेगाव रोडवर सोनवडी फाटा येथे आज पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर संजय तेलुरे (वय ३४ वर्ष ) रा. सिराळा ता. गेवराई असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर संजय तेलुरे हा तरुण गेवराईकडून स्वतःच्या मोटारसायकलने आपल्या गावांकडे जात असतांना जातेगाव रोडवरील सोनवाडी फाट्यावर त्याला मद्यपान करनाऱ्या तीन लोकांनी बेसलेरीची बॉटल फेकून मारली. दरम्यान ती बॉटल का मारली ? याचा जाब ज्ञानेश्वर याने विचारल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन तरूणांनी त्यांच्याकडे असलेल्या तीक्ष्ण हत्याराने ज्ञानेश्वर याच्या अंगावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.यानंतर ज्ञानेश्वर हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हल्लेखोर जागेवरून पसार झाले. हि घटना आज 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. जखमी तरूणाला गेवराईच्या खाजगी रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद याठिकाणी हलवण्यात आली असल्याची माहिती आहे. सदरील तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा