Subscribe Us

header ads

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तुलसी शैक्षणिक समूहाकडून आरोग्य मार्गदर्शन शिबिर उत्साहात

बीड स्पीड न्यूज 


८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तुलसी शैक्षणिक समूहाकडून आरोग्य मार्गदर्शन शिबिर उत्साहात

बीड(प्रतिनिधी):- देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी शैक्षणिक समूह आयोजित  ८ जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च रोजी आरोग्य मार्गदर्शन शिबिर तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्राचार्य अश्विनी बेद्रे यांची उपस्थिती होती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आहार तज्ञ डॉक्टर कीर्ति कुलकर्णी, राष्ट्रीय स्वास्थ कार्यक्रम समन्वयक जिल्हा रुग्णालय बीड सचिन हरणमारे, प्रमुख अतिथी म्हणून बालरोग तज्ञ डॉ. दिपाली वाघमारे,प्राचार्य उमा जगतकर,डॉ.दीपाताई रोडे यांची उपस्थिती होती.यावेळी आरोग्य मार्गदर्शन शिबिरात आहारतज्ञ डॉ. कीर्ति कुलकर्णी यांनी महिलांचे आरोग्य आणि आहार या 

विषयावर मार्गदर्शन केले. युवती व महिलांनी नियमित आरोग्य तपासणी व मानसिक,शारीरिक बळकटीसाठी प्राणायाम करावातसेच दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक तयार करून संतुलित आहारासह आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान करत या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, बीड जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समन्वयक सचिन हरणमारे यांनी ॲनिमिया ची कारणे आणि त्यावरील उपाय योजना यावर सखोल मार्गदर्शन केले. या आरोग्यविषयक शिबिरानंतर काव्यवाचन,गीतगायन स्पर्धा घेण्यात आल्या. गीतगायन स्पर्धेमध्ये सुनिता केंडे(७०) या आजीने बहारदार गीत गाऊन रसिकांचे मने जिंकली आणि प्रथम क्रमांकाने विजेत्या झाल्या तर सुनिता साळुंके यांनी सत्यम शिवम 

सुंदरम हे गीत गाऊन लतादीदींची आठवण जागी केली त्या द्वितीय क्रमांकाने विजेत्या झाल्या तर मनीषा पैठणकर यांनी दिल हे छोटासा छोटी सी आशा हे गीत गाऊन रसिकांची मने जिंकली आणि तृतीय पारितोषिक मिळविले, काव्यवाचन स्पर्धेमध्ये रितू जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळविला स्मिता महानवर द्वितीय तर अस्मिता आडगळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.भाग्यश्री पवार यांनी केले या दोन्ही स्पर्धेमध्ये युवती व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.सदरील कार्यक्रमाचे आयोजन तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड, तुलसी इंग्लिश स्कूल बीड, तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड यांच्या वतीने करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा