Subscribe Us

header ads

अंजनवती येथे होणार ३३/११ के.व्ही. उपकेंद्र आ.संदिपभैय्यांच्या प्रयत्नांना यश

बीड स्पीड न्यूज 


अंजनवती येथे होणार ३३/११ के.व्ही. उपकेंद्र
आ.संदिपभैय्यांच्या प्रयत्नांना यश


बीड (प्रतिनिधी):- तालुक्यातील अंजनवती परिसरातील गावे लोड शेडींगने त्रस्त झाल्याने गावातील व परिसरातील नागरिकांनी अंजनवती येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र सुरु करावे अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे केली होती. यानंतर आ.संदीप क्षीरसागर यांनी या महत्वच्या प्रश्नात लक्ष घालून महावितरण तसेच ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा करून ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न मार्गी लावला असून त्यासाठी २ कोटी ८७ लाख ६८ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.बीड मतदार संघातील अंजनवती गाव व आजूबाजूच्या परिसरातील लोड शेडींगने नागरिक त्रस्त होते.परिसरातील शेतीलाही विजेचा परिणाम होत होता. अंजनवती व परिसरातील नागरिकांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी याचा पाठपुरावा केला. गुरुवारी (दि.१०)  रोजी यासंदर्भात  महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व महावितरण चे संचालक संजय ताकसांडे यांच्यासमवेत बैठक  घेऊन चर्चा केली यावेळी डॉ. बाबू जोगदंड हे देखील उपस्थित होते. आता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न मार्गी लावला आहे. या कामासाठी २ कोटी ८७ लाख ६८ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असून प्रत्यक्षात कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. अंजनवती उपकेंद्र सुरु झाल्यानंतर चौसाळा उपकेंद्राच्या खूप मोठा भार कमी होणार असून अंजनवती परिसर व चौसाळा परिसरातील सर्व गावांचा वीजपुरवठा बऱ्याच प्रमाणात सुरळीत होणार आहे. यामुळे नागरिकांना विजेची सुलभ सेवा मिळणार आहे तसेच याचा शेती व शेतकऱ्यांनाही खूप मोठा फायदा होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा