Subscribe Us

header ads

अंबाजोगाई तालुक्यात तरुणाचा मृतदेह आढळला मृतदेहावरील जखमा घातपाताची शक्यता!


बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई तालुक्यात तरुणाचा मृतदेह आढळला मृतदेहावरील जखमा घातपाताची शक्यता!

अंबाजोगाई_(दि.09) अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथील गायरानात बुधवारी  सायंकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतदेहावरील जखमा पाहता घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरील मयत व्यक्तीचे नाव दिपक रामकिशन दगडे (वय ४०, रा. टाकळी शिराढोन, जि. लातूर) असे त्या मयत व्यक्तीचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने लोकांनी रस्त्याच्या बाजूला बघितले असता त्यांना तरुणाचे प्रेत आढळून आले. ही माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केला. या मृतदेहावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा