Subscribe Us

header ads

मंडळ अधिकारी नितिन जाधव यांच्या संशयास्पद अपघात मृत्यु प्रकरणात पंकज कुमावत यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी!

बीड स्पीड न्यूज 




मंडळ अधिकारी नितिन जाधव यांच्या संशयास्पद अपघात मृत्यु प्रकरणात पंकज कुमावत यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी!



तहसिलदार सुरेंद्र डोके यांच्या मोबाईलचे सीडीआर व टोलनाक्यावरील वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे

 लेखनीबंद आंदोलन पुकारणारे महसुल प्रशासन नितिन जाधव मृत्युप्रकरणात मुग गिळुन गप्प का??

बीड (दि. 9 मार्च):- तालुक्यातील म्हाळसजवळा येथील मंडळ अधिकारी नितिन जाधव यांच्या संशयास्पद अपघात प्रकरणात  सहाय्यक पोलीस अधीक्षक पोलीस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महसुल मंत्री, गृहमंत्री, विभागीय आयुक्त यांना केली असून संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.06 मार्च 2022 रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास बीडचे प्रभारी तहसिलदार सुरेंद्र डोके व म्हाळसजवळा ता. जि. बीड येथील मंडळ आधिकारी नितिन जाधव यांच्या गाडीचा सावळेश्वर फाटा याठीकाणी अपघात झाल्याचे व त्या दुर्देवी घटनेत मंडळ अधिकारी नितिन जाधव यांचा जागीच मृत्यु व तहसिलदार सुरेंद्र डोके जखमी झाले होते, दोघेही राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळा येथे अवैध वाळु वाहतुक विरोधात कारवाईसाठी गस्त घालणा-या पथकात असल्याचे दैनिकात प्रसिद्ध झालेले असून गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे विविध दैनिकातुन प्रसिद्ध झाले आहे.संबधित प्रकरण संशयास्पद असुन अपघात की घातपात याविषयी सर्वसामान्य माणसांमध्ये शंका असुन तहसिलदार सुरेंद्र डोके यांनी राक्षसभुवन येथे जाण्यापुर्वी शासकीय नियमानुसार वरिष्ठांची परवानगी घेतली होती का?? गस्ती पथकामध्ये गेले होते. तर मग शासकीय वाहनाद्वारे प्रवास न करता खाजगी वाहनाने प्रवास का?? तहसिलदार डोके यांनी अपघाताची कल्पना वरिष्ठांना दिली होती का?? बीड जिल्हा रूग्णालयात सर्व सुविधा असताना पुण्याला त्यांना का हलवण्यात आले या सर्व गोष्टी संशयास्पद असुन संबधित प्रकरणात  सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षते खाली उच्चस्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी  करण्यात यावी. तसेच तहसिलदार सुरेंद्र डोके यांच्या मोबाईलचे सीडीआर वटोलनाक्यावरील वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे तहसिलदार सुरेंद्र डोके यांचे त्या दिवशीचे सीडीआर तपासण्यात यावेत तसेच पाडळशिंगी टोल आवक जावक वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येऊन व संबंधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक कार्रवाई करण्यात यावी.

लेखनीबंद आंदोलन पुकारणारे महसुल प्रशासन नितिन जाधव मृत्युप्रकरणात मुग गिळुन गप्प का??

बीड जिल्ह्यातील वाळुमाफियांचे काही जिल्हाप्रशासनातील आधिका-यांसोबत हितसंबंध तसेच गटतटातुन वाळुमाफियांचा महसुल प्रशासनातील अधिका-यांवर हल्ला आदि पुर्वीच्या घटना पाहता लेखनीबंद आंदोलन करणारे महसुल प्रशासनातील मंडळ अधिकारी  नितिन जाधव मृत्युप्रकरणात गप्प का?? असा प्रश्न नागरीखांना पडला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा