बीड स्पीड न्यूज
जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या, पत्नीची केली होती हत्या
गेवराई_ जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर सुटलेल्या एका कैद्याने पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना 6 मार्च रोजी मध्यरात्री शहरातील माऊलीनगर येथे घडली. 7 मार्च रोजी सकाळी हा प्रकार समोर आला. सुनील दामोदर गायकवाड (49, रा. माऊलीनगर, गेवराई) असे मयत कैद्याचे नाव आहे. झोपेत कात्रीने पत्नी व दोन मुलांवर त्याने हल्ला केला होता. यात पत्नी व मुलाचा मृत्यू झाला होता, तर मुलगी वाचली होती. या प्रकरणात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो पॅरोलच्या रजेवर आला होता.सध्या पोटाच्या आजाराने तो त्रस्त होता. त्यामुळे तो निराश होता. यातून दि. 6 रोजी मध्यरात्री घरच्या दुसऱ्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. सकाळी झोपेतून जाग आल्यावर कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब आली. पोलीस अंमलदार नवनाथ गोरे यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात गेवराई येथे पाठवला.
0 टिप्पण्या