Subscribe Us

header ads

जागतिक महिला दिनानिमित माविम मार्फत बचतगट उत्कृष्ट उद्योजिका आणि सामाजिक क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींना विशेष गौरव पुरस्कार वितरण

बीड स्पीड न्यूज 


 जागतिक महिला दिनानिमित माविम मार्फत बचतगट उत्कृष्ट उद्योजिका आणि

         सामाजिक क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींना विशेष गौरव पुरस्कार वितरण

 

बीड, दि. 9 (जि. मा. का.) : जागतिक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय बीड च्या वतीने बचतगटाच्या उत्कृष्ट उद्योजिका व सामाजिक क्षेत्रातील  सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी व 

इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट उद्योजिका गौरव पुरस्कार प्रिती सुभाष ढवरे वैष्णवी देवी बचतगट,कळंब अंबा, ता.केज, उज्वला प्रकाश आजबे  तुळजाभवानी बचतगट, खापर पांगरी, ता.बीड, शिवकन्या दत्तात्रय दीक्षित दिशा बचतगट,धारूर, शांता घनशाम कसबे  रमाई बचतगट, कल्याण नगर, ता.माजलगाव, रजनी बापूराव लांडगे नागेश्वर बचतगट, शिरसमार्ग, ता.गेवराई, रोहिणी 

शिवाजी मस्के वैष्णवी बचतगट,पालवण, ता.बीड, जयश्री सदाशिव देशमाने, योगेश्वरी बचतगट, लोखंडी सावरगाव, ता. अंबाजोगाई  यांना प्रदान करण्यात आला.माविम जिल्हा समन्वय अधिकारी एस.बी.चिंचोलीकर यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले कि, महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण केले जाते. अशा सक्षम व कर्तुत्ववान 

उद्योजक महिलांना  आणि  सामाजिक क्षेत्रात महिलांच्या हक्क व अधिकारासाठी माविम सोबत संयुक्त काम करणारे बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्तेना पण माविम च्या वतीने गौरविण्यात येत आहे. चालू वर्षात बीड जिल्ह्यात २० कोटी चे सवलतीच्या दराने कर्ज वितरीत करून माविम जिल्हा कार्यालयाने आता पर्यंत ची सर्वोच्च कामगिरी केली आहे.तसेच सामाजिक क्षेत्रातील 

कर्तुत्ववान व्यक्ति करिता विशेष गौरव पुरस्काराने  मनिषाताई तोकले सामाजिक कार्यकर्त्या, रेखाताई संजय वेडे सदस्य- राज्य सुकाणू समिती तथा अध्यक्ष - जि.सु.स., तत्वशिल कांबळे  सामजिक कार्यकर्ते तथा माविम मित्र, शैलजा चिलवंत मुख्याध्यापक, जि.प.शाळा, बहिरवाडी, आबासाहेब करंडे माविम मित्र, कोळगाव, ता.गेवराई यांना गौरविण्यात आले. भक्ती महिला 

बचतगट, शिंपे टाकळी, ता.माजलगाव , जय हनुमान महिला बचतगट, भालगाव, ता.केज, भारती महिला बचतगट, तळेवाडी, ता. गेवराई, सावित्री महिला बचतगट, येलंबघाट, ता.बीड, जय हनुमान महिला बचतगट, बीड, जय भवानी महिला बचतगट, लोखंडी सावरगाव, ता.अंबाजोगाई या ६ बचतगटाना  सवलतीच्या दराने  रु 

३६ लाख ९० हजाराचे  ICICI बँकेचे कर्ज वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आपल्या शुभेच्छापर मार्गदर्शना मध्ये माविम च्या महिला सक्षमीकरण व  स्त्री पुरुष समानतेच्या कामाची प्रशंसा केली. तसेच महिला दिनानिमित सर्वाना शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्यांचा गौरव करण्यात आला अशा उत्कृष्ट उद्योजिका व माविम मित्रांचे मनोगत झाले. या कार्यक्रमाला अश्रू भोसले  जिल्हा व्यवस्थापक ICICI बँक, रेखाताई संजय वेडे सदस्य- राज्य सुकाणू समिती, माविम जिल्हा समन्वय अधिकारी एस. बी.चिंचोलीकर,  उत्कृष्ट उद्योजिका उज्वला आजबे, सामजिक कार्यकर्ते तथा माविम मित्र तत्वशिल कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक वैशाली नाईकनवरे व  प्रदर्शन व्यवस्थापक सविता औटी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक उषा राठोड, बेबी शिंदे, लेखापाल सुमित चव्हाण, धीरज करमरकर, क्षेत्रीय समन्वयक खंडू डोणे,पंकज जोगदंड,सोमनाथ बुलबुले, कार्यासन मदतनीस संतोष बुलबुले व सर्व सहयोगिनी यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा