Subscribe Us

header ads

पेठ बीड येथे पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड १२ जुगाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल; ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त

 बीड स्पीड न्यूज 


पेठ बीड येथे पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड १२ जुगाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

३८ हजाराचा मुद्देमाल जप्त 


बीड प्रतिनिधी| पेठ बीड येथे पंकज कुमावत यांच्या पथकाने एका पत्त्याच्या क्लबवर धाड टाकली. त्यात ३८ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेत १२ जुगाऱ्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ लोकांना ताब्यात घेतले आहे. तर ४ जुगारी पळून जाण्याचा यशस्वी झाले.या बाबतची माहिती अशी, की दि. ८ मार्च मंगळवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहिती मिळाली की,बीड येथील पेठ बीड भागातील चांदण्याचा वाडा येथे प्रकाश चांदने व त्याचे साथीदार हे त्यांच्या स्वतःचे फायद्या करिता त्याचे घरा समोरील पत्र्याचे शेडचे बाजूला लोकांना एकत्र बसून जन्ना-मन्ना नावाचा पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून जन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवीत आहे. अशी माहिती मिळाल्या वरून सदरची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात साहेब यांना कळविल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस अंमलदार यांनी पंचासह सदर ठिकाणी जाऊन दि. ८ मार्च रोजी १०:४५ वा. छापा मारला. तेथे जन्ना-मन्ना नावाचा पत्त्याचा जुगार खेळणारे लोक पोलीस पथकांना पाहून पळून गेले. पोलीसांनी पाठलाग करून ८ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले तर ४ जुगारी पळून जाण्याचा यशस्वी झाले. त्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत ३८ हजार ६२० रु. व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीस नाईक बाबासाहेब बांगर यांचे फिर्यादी वरून १२ जुगाऱ्या विरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा