Subscribe Us

header ads

वाकनाथपुरला दोन महिन्यापासून महावितरणचा कर्मचारी नसल्याने गावातील लाईटचे वाजले तीन तेरा; वरिष्ठांनी लक्ष घालावे गावकऱ्यांची मागणी

 बीड स्पीड न्यूज 


वाकनाथपुरला दोन महिन्यापासून महावितरणचा कर्मचारी नसल्याने गावातील लाईटचे वाजले तीन तेरा; वरिष्ठांनी लक्ष घालावे गावकऱ्यांची मागणी 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_गेल्या दोन महिन्यांपासून वाकनाथपुर या गावातील गावकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या हलगर्जी पणाने या गावाला कोणताही  लाईनमेन येत नसल्याने गावकऱ्यांना दिवस रात्र डी पी मध्ये जाऊन लाईट चालु करावी लागते. या गावात लाईनमेन येत नसल्याने गावातील लाईट चे तीन तेरा वाजले आहेत. दिवसातून अनेक वेळा गट्टू न्यूटन होतोय रात्री अपरात्री गट्टू न्यूटन झाल्याने येवढ्या रात्री गावातील नागरिक डी पी जवळ जाऊन बांबु च्या साह्याने गट्टू चालु करावा लागतो रात्रीच्या वेळेस जर कोणाला काही झाले तर याचं जिम्मेदार कोण? महावितरण कर्मचारी फक्त बिले घेऊन येतात बिल वसूल करून जातात परत दुसरे बिल येऊ पर्यंत कोणी गावात येत नाही. याची माहिती गावकऱ्यांनी वरिष्ठांना अनेक वेळा देण्यात आली परंतु कोणीही समस्यांचे निवारण केले नाही उलट तुम्हीच गावकऱ्यांना समजुन सांगा दवंडी द्या असे बोलले गेले जर वरिष्ठांना सांगून समस्येचे निवारण होत नसेल तर निवारण कोण करणार असा प्रश्न निर्माण होतो. जसे बिल वसूल करता त्या प्रमाणे लाईट ही सुरळीत चालु करा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा