Subscribe Us

header ads

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीड ची कार्यकारणी जाहीर; अध्यक्ष पदी अमृतलाल सारडा तर सचिव पदी अशोक कांबळे यांची सर्वानुमते निवड

बीड स्पीड न्यूज 



विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीड ची कार्यकारणी जाहीर

अध्यक्ष पदी अमृतलाल सारडा तर सचिव पदी अशोक कांबळे यांची सर्वानुमते निवड

डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कारा सह
2 एप्रिल पासून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन---  नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड (प्रतिनिधी) 4 मार्च विश्ववदंनीय,विश्वरत्न,महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार,तमाम भारतीयांचे उद्धारकर्ते अखंड भारताचे कैवारी भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारत देशासह संपूर्ण विश्वात मोठया हर्ष उत्सवात साजरी करण्यात येते परंतु मागील दोन वर्षापासुन कोरोना संकटामुळे  महामानवांची जयंती साजरी करता आली नाही याचे अतीव दुःख सर्व अनुयायांना असून यावर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठया उत्सवाने साजरी करण्यात येणार असून डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीड च्या वतीने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पेठ बीड उत्सव समिती ची कार्यकारणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष पदी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे थोर समाजसेवक तथा उद्योजक अमृतलालजी सारडा तर सचिवपदी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली असून संयोजन समिती मध्ये  संदीपजी उपरे,अजिंक्यजी चांदणे,रामसिंग अण्णा टाक,बबनराव गोरे,ओमप्रकाश तोतला डॉ अंकुश कुटे, डॉ लक्ष्मण जाधव,प्रेम चांदणे,अमोल पोळ, श्रीराम कुरे,देवेंद्रजी ढाका, जाफर पठाण,गौतम कांबळे,भागवत बादाडे,रुस्तुम बेद्रे,महादेव वाघमारे,अविनाश जाधव, विलास बामने,नागेश पवार,विजय चांदणे,राहुल शिंदे,मंगेश जोगदंड, महादेव वंजारे, सचिन जाधव, राजु जोगदंड, सह आदीचा समावेश करण्यात आला असल्याचे समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.दिनांक 4 मार्च रोजी यशवंत उद्यान पेठ बीड येथे युवा नेते डॉ योगेशजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक अँड विकासजी जोगदंड,अजिंक्यजी चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पेठ बीड उत्सव समिती ची कार्यकारणी निवडण्यात आली 2 एप्रिल पासून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराचे देखील आयोजन करण्यात आल्याचे पेठ बीड उत्सव समितीचे संस्थापक तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून सांगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा