Subscribe Us

header ads

आ. सुरेश धस आणि प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश

बीड स्पीड न्यूज 



आ. सुरेश धस आणि प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश


मुंबई_ भाजप आमदार सुरेश धस आणि मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दरेकर आणि धस दाम्पत्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत. तब्बल 27 कोटींचे कर्जवाटप बोगस दस्ताऐवजांच्या आधारे केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राज्याच्या सहकार खात्याने दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.धस यांच्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आले होते. बोगस दस्ताऐवज त्यासाठी तयार करण्यात आले होते. या कर्जप्रकरणात मुंबै बँकेने मोठी अनियमितता केलेली असून सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद आणि आर्थिक गैरवापर करण्याच्या उद्देशाने केल्याचे दिसून येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर हितसंबंधित लोकांना कर्ज वाटप केल्याचा आरोप आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तावेजांच्या आधारे 27 कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या वाटप केल्यामुळे कर्ज देणार व घेणार यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक व अनियमितताअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत. हे कर्ज वाटप करण्यात आले, त्यावेळी प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे अध्यक्ष होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा