Subscribe Us

header ads

तुलसी पॅलेट फॅशन एक्झिबिशन चे पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांच्या हस्ते उद्घाटन

बीड स्पीड न्यूज 



तुलसी पॅलेट फॅशन एक्झिबिशन चे पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा सन्मान २०२२ या पुरस्काराने सरपते,व्हावळ, पवार सन्मानित


बीड(प्रतिनिधी):- देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी शैक्षणिक समूह आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त तुलसी पॅलेट फॅशन एक्झिबिशन चे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे, खाडे सर, 

प्राचार्य अश्विनी बेद्रे,प्राचार्य उमा जगतकर,डॉ.प्रियंकाताई रोडे यांची उपस्थिती होती. दिनांक ८ मार्च रोजी तुलसी शैक्षणिक समूहाकडून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड, तुलसी इंग्लिश स्कूल बीड, तुलसी संगणकशास्त्र व 

माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड यांच्या वतीने  कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा सन्मान २०२२ या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  यावेळी समाजसुधारक महानायिकांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांच्या 

हस्ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आयु.पंचशीला भास्कर सरपते यांना कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा सन्मान २०२२ सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय  कामगिरी केल्याबद्दल आयु.लोचनाबाई बाबुराव व्हावळ यांना 'कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा सन्मान २०२२ उद्योजक' या पुरस्काराने सन्मानित आले तर अल्पावधीतच आपली कार्यकुशलता दाखवत औद्योगिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्रीमती प्रीती बाबासाहेब पवार यांना 'कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा सन्मान २०२२ युवा उद्योजक' या पुरस्काराने सन्मानित आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्सना राठोड यांनी केले. याप्रसंगी महानायिका वेशभूषा, होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचे सूत्रसंचालन मोहिनी मसूरे यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीडच्या वतीने तुलसी पॅलेट  फॅशन एक्झिबिशनचे आयोजन दिनांक ८ मार्च ते १० मार्च  दरम्यान आले आहे.  हे एक्झिबिशनच सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील. यामध्ये गारमेंट्स, कुशन कव्हर, बॅग, ज्वेलरी, पेंटिंग, शोभेच्या वस्तू, कुर्ती, नववार साडी, घागरा, लहान मुलांचे कपडे इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. याचा बीड शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड, तुलसी इंग्लिश स्कूल बीड, तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा